पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ७ गीतारहस्यावरील अभिप्राय व टीका ५३ आधिभौतिकत्वाची वाटेल तितकी हेटाळणी केली आहे. पण त्याने समाधान होत नाही. " असो. याखाली सर्व इतर टीका ! कारण त्यात गीतारहस्याचे दोष दाखविले असले तरी काही गुणहि घेतले आहेत. दरम्यानच्या इतर टीका करणाऱ्यामध्ये प्रो. बेलवलकर प्रो. रानडे छापखाने वकील यासारखे काही टिळकांचे चहातेहि आहेत. त्यानी गीतारहस्याची वहावा केली आहे. पण मधून मधून काही शंकाहि प्रकट केल्या आहेत. हे निव्वळ बौद्धिक टीकाकार म्हणण्याला हरकत नाही. कारण यांच्या ठिकाणी शंकराचार्यांविषयी जसा आदर तसा टिळकाविषयीहि होता. त्याना येऊन जाऊन दोष दिसला तो टिळकानी क्वचित ठिकाणी शंकराचार्यांच्या भाष्याचे विकृत स्वरूप दाखविले याकरिता. त्यातल्या त्यात छापखाने यांची टीका विशेष विस्तृत व समर्पक आहे. त्यांची उभयविध टीका थोडक्यात खालील शब्दात देता येईल. "गीतार्थाची संगति व एकवाक्यता 'गीतारहस्यात' ज्या सरळ पद्धतीने केली आहे तीत जे ज्ञानगांभीर्य व वाचन प्रकट होत आहे त्याहून अधिक ज्ञान व अधिक पांडित्य या विषयावर इंग्रजीत प्राकृतात व मराठीत क्वचितच प्रयुक्त झाले असेल. व हा ग्रंथ लोकमान्य होण्यास इतर कारणे नसती तरी स्वयंप्रकाशानेच तो योग्य मानास चढला असता व इतउत्तर चढेलहि यात तिळमात्र शंका नाही. परंतु लो. टिळकासारख्या स्वभावतः तीव्र बुद्धीच्या पुरुषाकडून 'संन्यास' व 'कर्म' या दोन निष्ठांच्या तात्त्विक क्रमाविषयी व व्युत्पत्तीविषयी जो सांगोपांग विचार गीतारहस्या- सारख्या अध्यात्मविषयपरग्रंथात सहजच अपेक्षित होता तो त्यांच्या या ग्रंथात ठळकपणे केलेला दिसून येत नाही. यामुळे एवढ्या शुद्ध अंतःकरणाने समबुद्धीने व कल्पकतेने लिहिलेल्या ग्रंथासहि पक्षमंडणार्थं लिहिलेल्या व्याख्यानाचेच अंशतः स्वरूप येत आहे ही किंचित् खेदाची गोष्ट आहे. " छापखाने यांचा निर्णय असा की " भारतात वर्णिलेल्या प्रसंगाची कल्पना लक्ष्यात दृढ धरली म्हणजे श्रीकृष्णाचे गीतेतील कर्मप्रवृत्तीविषयीचे उत्साहप्रधान वचन यथायोग्यच वाटते. व सांप्रतच्या हिंदुस्थानच्या स्थितीस उद्देशून जरी गीतेचा अर्थ टिळकानी मुद्दाम लाविला असता तरी तो याहून भिन्न झाला नसता. हे जरी खरे आहे तरी मोक्षाचे सोपे साधन कोणते या प्रश्नाचा 'आचार्य' (रिलेजस टीचर ) या अधिकारास अनु- सरून अधिकारी शिष्यासाठी परमार्थतः उत्तर देणे झाल्यास शंकराचार्यांचे भाष्य अधिक श्रेयस्कर होईल असे म्हटले तर ते केवळ गैर होणार नाही. " गोविंदसुत चिंचाळकर यानी टिळकाविषयी आदर दाखविला आहे तरी एकंदरीने ग्रंथाला नाकच मुरडले. त्यांचा मुख्य आक्षेप असा की "टिळकाना आत्मानुभव (!) नसल्याकारणाने अशा विषयावर लिहिण्याची व शंकराचार्यासारख्या. वर टीका करण्याची त्यांची पात्रताच नाही. ठिकठिकाणी कर्मच करावे असे वेळा अवेळी सांगून टिळकानी वाचकांच्या मागे 'च'काराची विनाकारण टोंचणी लावली. लोकसंग्रह या शब्दाचे महत्त्व उगीच वाढविले. सर्व कर्म-संन्यास म्हणजे