पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५२ लो० टिळकांचे चरित्र भाग ७ भूतहितदृष्टीने प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या प्रयत्नाने पुष्कळ सुख-होय ! अगदी निव्वळ आधिभौतिक ज्यात अध्यात्माचा गंधहि नाही असे सुख भोगीत आहेत. दुःख नाही असे नाही. दुःख आहे. पण ते कमी करण्याच्या विचारात व प्रयत्नात ते गढले आहेत. इकडे प्रकृति तन्मात्रे लिंगशरीर आत्मा परमात्मा मोक्ष ब्रह्म या पोकळ शब्दांच्या जाळ्यात गुरफटून ब्रह्मानंदी टाळी लागली नाही म्हणून ते रडत बसत नाहीत. तसेच निष्काम कर्मयोगाची कास धरून आधिभौतिक सुखाला व ज्ञानाला ते लाथ मारीत नाहीत. तरुणपणीच संन्यास घेऊन एखाद्या बाईच्या प्रश्नांची स्वानुभवपूर्ण उत्तरे देता येत नाहीत म्हणून परकायाप्रवेशाच्या ढोंगाने सुरतरसाचा आस्वाद घेत नाहीत. अगर सोळा सहस्रनारीचा उपभोग घेऊन वरती मी ब्रह्मचारी असला लोकसंग्रह करीत नाहीत. 'दही खाऊ मही खाऊ की चाकवताची भाजी तोंडाला लावू' अशी त्या आधिभौतिकवाद्यांची स्थिति नाही. तुम्हाला ते सुख व ज्ञान कनिष्ठ वाटते ना ? त्याच्याकरिता हळहळू नका. सर्व हिंदुधर्माच्या लोकाना निदान त्यातील ज्ञानाचा गड्डा पदरी बांधलेल्या ब्राह्मणाना, त्यातल्या ल्यात सध्याच्या आचार्यपंडिताना, अगर आचार्यपदारुरुक्षूंना इतिहास दृष्टीच्या मिषाने तरी कर्मयोगाचे पुनरुज्जीवन फार वेळ टिकले नाही म्हणून हळहळ का वाटावी ? हळहळीचे कारण उघडच आहे. मुसलमानानी आमचा देश जिंकला. वाटले वाईट. रामदासशिष्य शिवाजीने स्वराज्य स्थापना केली झाला आनंद. अटकेला ब्राह्मणी झेंडा नेला झाला आनंद, सोनपतपानपत गेले झाला विषाद. माधवरावाला रामशास्त्र्यानी स्नानसंध्या करीत बसू नको म्हटले झाला आनंद. पाजी बाजीचेंहि राज्य इंग्रजांनी घेतले झाला विषाद. सत्ता- वन साल बरें वाटले पण शस्त्रे गेली म्हणून वाईट वाटले. कांग्रेस झाली आनंद उत्पन्न झाला. भिक्षांदेहि करतात वाटले वाईट. निर्भेळ स्वराज्य शब्द पुढे आला आनंदांत झाले मन. वसाहतीचे स्वराज्य पुरे म्हणताच झाला खेद. खुदिरामबो- सच्या कृत्याने वाटली मजा. मन्डालेच्या एकान्तिक तपाने झाला खेद. रा. टिळ- कांनी गीतारहस्य लिहिले लागले आनंदसागरांत पोहावयाला. अध्यात्मज्ञान्यांना असला हर्षखेद हवा कशाला ? गुरुजी, राग करू नका. ' शिष्यस्तेहं शाधि मा त्वां प्रपन्नम् '. ख्रिस्ताच्या उपदेशाला तुम्ही वाटेल तितके हंसा. पण त्याच्या अनुयायानी दोन हजार वर्षांच्या आंत जवळ जवळ सर्व जग पादाक्रांत केले आहे ते कशाने ? तर ख्रिस्ताला ' आमचा गुरूच नव्हे' असे म्हणून का ? की त्याच्या उपदेशाचा जेवढा भाग जरूर आचरणात आणण्यासारखा व येण्यासारखा तेवढा आणून आणि बाकीचा निमूटपणे मागे सारून? त्यांचा बायबलावर कितीहि विश्वास असला तरी त्यातील सृष्टयुत्पति प्रकरणाला ते कोठे चिकटून राहिले आहेत ? पण आम्ही प्रकृति-पुरुष प्रकृति - पुरुष आत्मा-परमात्मा आत्मा-परमात्मा करीत बसलो आहो. गीतारहस्यात सुद्धां कर्मसंन्यास नव्हे तरी निष्काम कर्मयोग हे सार काढले. त्याच्या अनादित्वाचे व परमश्रेष्ठत्वाचे वाटेल तितके गोडवे गाइले आहेत. व