पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ७ गीतारहस्यावरील अभिप्राय व टीका ५१ आधिभौतिकच ना ? त्यानी आपल्याला जिवे मारिले तरी काय झाले ? ' हन्य- माने शरीरे नायं हन्यते '. आपला आत्मा दुसऱ्या साली पांघरील. त्यांची बुद्धि सम नसल्यामुळे ते फार तर पापी ठरतील. 'येथे कोणाचे काय वा गेले ? ज्याचे त्यानेच अहित केले. ' एवंच शंका अशी रहाते की ही आधिभौतिक शास्त्रे पहून आपला त्या पाश्चिमात्याशी टिकाव लावायचा तो कशाकरिता १ " ' पट्टशिष्य ' हा बहुधा एक विद्वान् प्रोफेसर असावा. पण टिळकांच्या निमित्ताने गीतेला, गीतेच्या निमित्ताने कृष्णाला, कृष्णाच्या निमित्ताने हिंदुधर्माला नावे ठेवताना तो शब्दाने किती बहकला हे दाखविण्याला आम्ही खालील उतारा देतो. 'अर्जुन अगदी आयत्या वेळी क्लीब होऊन बसला हे कोणाचे दुर्दैव ? तुमचे आमचे ? की केवळ त्या द्रौपदीचे ? की कृष्णाचे ? की अर्जुनाच्या काळा- पर्यंत होऊन गेलेल्या धर्मव्याख्यानाचे ? अगर तीं व्याख्याने करणाऱ्यांचे ? अगर लोकसंग्रहकारांचे ? किंवा हे खापर केवळ कर्मसंन्यास संप्रदायावर फोडावयाचे ! रा. टिळकाना मोगलाईच्या काळी कर्मयोगाचे पुनरुज्जीवन फार वेळ टिकले नाही म्हणून आमचे दुर्दैव असे वाटते. ज्या धर्माने महाभारतासारख्या मार्मिक काळात सूक्ष्म विचारी ऋषिमुनींच्या सहवासात व श्रीकृष्ण भगवंताच्या नित्यसाह- चर्यात राहणाऱ्या महाभारत लिहिणाऱ्यांच्या अर्थात् श्रीकृष्णाकडून उपनिषदाचे अमृततुल्य सार काढवून अर्जुनाच्या तोंडात बळजबरीने ओतवणाऱ्या श्रीव्यास- सुनीच्या दर्शनाचा लाभ घडलेल्या, व त्या श्रीमद्व्यासमुनीच्या हयातीत जिवंत अस- णाऱ्या त्याच व्यासमुनीच्या नातवाला अशा आणीबाणीच्या वेळी क्लोत्र करून सोडले त्या धर्मातच क्लैब्य असले पाहिजे. ' याहीपेक्षा प्रखर उतारा खालील आहे. "रा. टिळक म्हणतात 'हा (कर्म- योग ) आमच्या देशात अनादिकालापासून चालत आला आहे असे सिद्ध होते. ' (गी. र. ४९४ ) सिद्ध होत असेल व चालत आला असेल. पण तो कर्मयोग- कर्मसंन्यासच केवळ नव्हे-क्लीव आहे. आपले कर्मसंन्यासाचेच नव्हे तर निष्काम- कर्मयोगाचेहि ध्येय घेऊन बसा. अध्यात्माचे गोडवे गाऊन आधिभौति- काची हवी तितकी टवाळी करा. पण मग इतिहासाकडे व वर्तमानकाळाकडे पाहून बालवैधव्यदग्धेसारखे रडत तरी बसू नका. एखाद्या स्थविराविधवेसारखे उदासीन राहून आमरणान्त दासीचे काम आनंदाने करा. खिस्ती धर्म कसाहि असला, त्याच्या अनुयायाना अध्यात्मज्ञानाचा गंधहि नसला, स्वतः ख्रिस्ताने जरी एका गालफडात मारली तर दुसरा गाल पुढे करा' असा उपदेश केला असला तरी या कर्मभूमीतच या दृश्य सृष्टीतच त्याच्या अनुयायानी सत्याचा शोध चाल विला आहे. मनुष्याला एखादे सहावे इंद्रिय उत्पन्न होईल काय म्हणून तो वाट पहात आहे. कालगणना दृश्यसृष्टीतील भूगर्भविद्येवरून व आकाशगणना त्याच दृश्यसृष्टीतील ज्योतिर्विद्येवरून करण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. आधि- भौतिक दुःखातून आधिभौतिक सुखात नेण्याचा स्वार्थनिरपेक्ष अगर सर्व ८