पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लो० टिळकांचे चरित्र (२३) कॅप्टन बसू यांचे केळकराना पत्र भाग १ अलाहाबाद २३ जुलै १९१५ माझा 'लिटररी इयर बुक' हा ग्रंथ छापत आहे. तो एक महिन्यात तयार होईल. यानंतर 'एन्सायक्लोपीडिया इंडिका' या नावाचा ग्रंथ काढण्याचा माझा विचार आहे. हा संदर्भ-ग्रंथ फारच उपयुक्त होईल. तुम्हाला ज्या विषयात विशेष गोडी लागते त्यावर लहानसे लेख लिहून तुम्ही पाठवाल का ? यासोबत काही प्रसिद्धीपत्रके पाठवीत आहे. ती तुमच्या स्नेहीमंडळीपैकी निरनिराळ्या विषयात निष्णात असलेल्या लोकाना द्या. टिळकानाही लेख लिहिण्याविषयी विनंति करा. ते वेदकालनिर्णयावर लेख लिहितील काय ? (२७) अळेकर यांचे केळकराना पक्ष नागपूर १३ सप्टेंबर १९१५ आम्ही इकडे संयुक्त परिषदेची खटपट चालविल्याचे तुम्ही ऐकलेच असेल. रा. ब. मुधोळकरांनी येथील प्रमुख पुढाऱ्याना पत्रे लिहून परिषद काँग्रेसच्या घटनेप्रमाणे भरावी असे सुचविले. हे समजताच आम्हीहि खटपट केली. यामुळे एकपक्षीय सभा करणे बरे नव्हे असे त्यानी उलट लिहिले. आता मुधोळकर पुनः असे सुचविणार आहेत की, परिषद दोन्ही पक्षाची मिळून भरवावी पण प्रति- निधीनी काँग्रेसच्या प्रतिज्ञालेखाला मान्यता द्यावी. तरी याबद्दल टिळकांचा व तुमचा अभिप्राय काय तो कळवावा. मुधोळकरानी टाईम्स ऑफ इंडियात पत्रे लिहिली त्याकडे तुम्ही लक्ष देऊन पत्रातून काही लिहिले नाही हे चांगले झाले. (२८) बेझन्टबाईचे टिळकाना पत्र तुमचे घरी ठरल्याप्रमाणे गोखल्यांच्या सूचनेवरून विषयनियामक मंडळा- पुढे मी उपसूचना आणावयाचे ठरविले. इतक्यात गोखले यांचा तोंडी निरोप आला की, टिळकानी केसरीत अपमानास्पद लेख लिहिला आहे म्हणून उपसू- चना आणू नका. पण मी त्यामुळे उपसूचना परत घेतली नाही. त्यामुळे ते मज- वर प्रथम फार रागावले, तुमचा लेख मी पाहिला नाही. पण गोखल्याना तो फार लागला होता असे दिसले. तरी गोखल्यानी शेवटी मी उपसूचना परत घेण्याचा आग्रह सोडला. (२९) लंडन सॉलिसिटर चे दाजीसाहेब खरे याना पक्ष २९ आक्टोबर १९१५ टाईम्स पत्राचे सॉलिसिटर मि. सोम्स हे आम्हाला येऊन भेटले. ते म्हणाले ' पुस्तक प्रसिद्ध केल्यानंतर ताईमहाराज प्रकरणात प्रिव्ही कौन्सिलने