पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५० लो० टिळकांचे चरित्र भाग ७ म्हणूनच जशास तसे वागावे आणि लोकसंग्रहार्थ काय वाटेल ते करावे हे तत्व टिळकाना पटले असावे " असे या पट्टशिष्याने लिहिले आहे. तो म्हणतो " जर तेच हे भगवान असतील तर धर्माला संदिग्ध बोलावयास लावणारे, जयद्रथाचा वध अभ्दुत युक्तीने करविणारे, भीष्मावर रथचक्र उगारणारे, व प्रतिज्ञाभंग झाला नाही अशी मुजोरी करणारे, जरासंधाच्या वेळी वचनभंग करणारे, गदापवत अध- र्मयुद्ध करू लावणारे, आणखी पुनः कर्णावर मुजोरी करून अर्जुनाला बाण सोड- वयास लावणारे, वगैरे वगैरे जे भगवान ते एकच असतील तर 'लोकसंग्रहार्थं वाटेल ते करावे' हाच निर्णय सामान्य जन काढतील. याकरिता तरी जनकाच्या तोडीला या श्रीकृष्ण उर्फ भगवानाना रा. टिळकानी बसवावयाचे नव्हते. शिवाय 'दोग्धा गोपालनंदनः ' यावरून हा भगवान् गोकुळातील 'यशोदेचा कान्हा' जर मानावा लागला तर निष्काम कर्मयोगाची रा. टिळकानी जी एवढी तरफदारी चाल- विली आहे ती धुळीला मिळाल्यासारखी होईल !" टिळकानी गीतारहस्यात आधिभौतिक सुधारणाना कमी महत्त्व देऊन अध्यात्मिक सुधारणाना वरिष्ठपणाचा मान दिला हे पाहून 'पट्टशिष्या' चे पित्तच अगदी खवळले. तो लिहितो -" दाताला दात व हाताला हात बुक्कीला बुक्की व लाला लाथ हे तत्त्व रानटी असे वाटते. पण ज्यांना ' अरे तर कारे ' कर- ण्यावाचून चैनच पडत नाही त्याना ही उत्तम नीति वाटेल हे खरे. 'एका गालात मारली तर दुसरा गाल पुढे करावा' या ख्रिस्तवचनाची विल्हेवाट ' तसे वागला आहे कोण ?' एवढ्यानेच लावणारे 'आपले ध्येय फार उत्तम असले पाहिजे' असे एकदाचे बोलणे विसरतात यात आश्चर्य आहे. पण आश्चर्य कसचे १ जेव्हा जे प्रतिपादन लागू पडेल तेव्हा ते योजावयाचे व प्रतिपक्षाची टवाळी करावयाची हाच ज्यांचा धंदा त्यानी काही केले तरी आश्चर्य नाही. 'अरे तर कारे' ही नीति असे घटकाभर कबूल केले तरीहि आधिभौतिक शास्त्राचा अभ्यास करून त्यात नवे नवे शोध लावणारी पाश्चिमात्य राष्ट्रे आपली आधिभौतिक उन्नतिच संपाद- तात. ते तुम्हाला काय करतात ? त्यांचा उत्कर्ष-पुनः आधिभौतिकच उत्कर्ष - हा- तुम्हाला पहावत नाही काय ? इतका तुम्हाला त्यांचा मत्सर वाटतो काय ? हेच का तुमचे अध्यात्मज्ञान गुरुजी ? समजलो, गुरुजी, तुम्ही म्हणाल " पण ती पाश्चि- मात्य राष्ट्रे आपलाच ऐहिक उत्कर्ष करून राहात नाहीत. रावणाने तपश्चर्या करून शिव प्रसन्न करून घेतला व सर्व देवास बंदिवान केले व माजला. तशी ही राष्ट्रे येऊन त्या आधिभौतिक ज्ञानाच्या साह्याने आमची स्वतंत्रता हरण करून आमच्यावर राज्य कर- तात. एकंदर मनुष्यजातीला पीडा देतात. म्हणून 'जशास तसे' या न्यायाने त्यांची ती शास्त्रे शिकायची नवे शोध लावावयाचे व आपली स्वतंत्रता परत मिळवावयाची. ” तथापि माझी शंका अशी आहे, गुरुजी, अध्यात्मज्ञानप्रवीण जे आपण त्यानी या खटाटोपात का पडावे ? आपली स्वतंत्रता पाश्चिमात्य राष्ट्रानी घेतली किंवा घेतील. पण त्याबद्दल आपणास हळहळ हवी कशाला ? ती स्वतंत्रता