पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ७ गीतारहस्यावरील अभिप्राय व टीका ४९ हिब्रू भविष्यवादी लोक ईश्वराचे म्हणून आपल्याच मनचे बोलत त्याप्रमाणे कृष्ण किंवा शिव यांचे नाव घेऊन आपल्या जुन्या ग्रंथकारानी आपल्याच मनचे दडपून देण्याला कमी केले नाही. पण बोलून चालून ती माणसे. त्याना आपल्या मर्यादा कशा उल्लंघिता येणार ? म्हणून गीतेमध्ये जुन्या लोकांचा श्रद्धाळूपणा व त्याचबरोबर त्यांचे अज्ञान वगैरे गोष्टी दिसून येतात. " ही टीका करताना टिळकच राजवाड्यांचे डोळ्यापुढे होते यात संशय नाही. आणि अशा रीतीने गीतारहस्य लिहून टिळकानी गीतेवर उपकार करण्यापेक्षा राजवाड्यांच्या या टीकेमुळे अपकारच केले असे ठरते ! एक म्हणतो “टिळक 'आचार्यपदारुरुक्षु' आहेत. ते 'आचार्यबुभूषु' आहेत. त्यानी काही तरी नवे सांगतो असे भोळ्या लोकाना भासवून उगीच ५०० पाने खरडली." दुसरा म्हणतो "टिळकानी गीतेचे रहस्य तर सांगितले नाहीच पण जुने आचार्य व साधुसंत यावर निवळ पुष्पांजली वाहण्याचा अतिप्रसंग मात्र केला. " निळकंठराव सहस्रबुद्धे या नांवाचे एक साहेबी थाटाचे पण अण्णासाहेब पटवर्ध नांचे भक्त म्हणविणारे एक पेन्शनर आहेत. वेदांत शास्त्रावर लिहिण्याचा त्यांचा अधिकार कोणीहि कधीहि मानलेला नाही. तथापि त्यानी सुधारक पत्रात अशी प्रौढी मिरविली की "टिळकांच्या कर्मयोग शास्त्रग्रंथातील हजारो प्रमाद लोकापुढे साधार सादर करण्यास मला बरेचसे ग्रंथ लिहावे लागतील ! व इतके मोठे कार्य वर्तमानपत्रातून होणे शक्य नाही म्हणून शितावरून भाताची परीक्षा या न्यायाने काही ढोबळ चुका दाखवितो !" पण शेवटी प्रत्यक्ष चुका नमूद करिताना भाताचा हंडा अदृश्य होऊन नमुन्याचे तेवढे एकच शीत निळ- कंटरावजीना वाचकाना जेवू घालता आले. सहस्रबुद्धे लिहितात " टिळकानी शंकराचार्यांवर टीका करून सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला आहे. ' अहंभाव ज्या मानसीचा सरेना तया ज्ञान ते अन्न पोटी जिरेना' अशी टिळकांची गत झाली आहे. म्हणून टिळकानी विद्वत्तेचा टेंभा मिरवून शंकराचार्यावर अज्ञानाचा टेंभा मिरविल्याबद्दल त्यानी पुन्हा एकवार प्रायश्चित्त घ्यावे. पण तेहि श्रद्धापूर्वक न घेतले तर त्यांच्या पापकर्माचे क्षालन होणार नाही. सुधारकात टीका करणाऱ्या ' पट्ट शिष्या 'ने टिळकांच्या बरोबर गीता सांगणाऱ्या श्रीकृष्णाचीहि खूप हजेरी घेतली. ती इतकी की त्या बिचाऱ्याच्या सगळ्या चरित्राची झडती निघाली ! आणि ती वाचून श्रीकृष्णाला कदाचित् असेहि वाटले असेल की 'असंगाशी संग व प्राणाशी गाठ.' कोणी या उप- यापी टिळकाना माझ्या गीतेवर एवढा ग्रंथ लिहावयास सांगितला कोणास ठाऊक ! " संपादक टिळक व इतर टिळक एक नव्हत त्याचप्रमाणे गीता सांग- णारा श्रीकृष्ण व गौकुळातला श्रीकृष्ण एक नव्हत. आणि या अनैक्याच्या सब- बीवर दोघानादि सारखाच धिंगाणा घालिता आला या बोटावरची थुंकी त्या बोटावर करता आली. कपट करूनच्या करून त्याचे समर्थन करता आले. आणि