पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४८ लो० टिळकांचे चरित्र भाग ७ “मम्मट जगन्नाथ इत्यादि संस्कृत-साहित्य-शास्त्रकार किंवा ड्रायडन कॉलेज वर्डस्वर्थ इत्यादि इंग्रज साहित्यशास्त्रकार यांची काव्याची व्याख्या लक्ष्यात घेतली तर गीता है काव्य म्हणण्याच्या लायकीचेहि ठरत नाही. त्या लहानशा ग्रंथात व्याकर- णाच्या शेकडो चुका आहेत. क्रियापद आत्मनैपदि की परस्मैपदि हेहि गीता लिहिणा- राला चांगलेसे माहित नव्हते. शब्दांचे संधि पदोपदी चुकले आहेत. विभक्तिप्रयोग अनेक ठिकाणी चुकले आहेत. गीतेतील संस्कृतावर प्राकृताची छाया पडली आहे. श्लोकांचे भाग योग्य सांधा न जोडता विस्कळीत असे लिहिले आहेत. वाक्य- रचनेमध्ये गोंधळ व गुंतागुंत झाली आहे. संबंधी सर्वनामे व नामे यांचा जाब बरोबर राहिलेला नाही. एका वाक्यातले शब्द दुसऱ्या वाक्यात गुंतून गेलेले आढळतात. पुष्कळ समास चुकीने जोडले आहेत. कित्येकांचा विग्रहहि करिता येत नाही. कित्येक ठिकाणी हा समास आहे की तद्धित आहे हे कळत नाही. तुहि ही पूरक पदे वाटेल तशी दडपून दिली आहेत. कोणताहि विशेष अर्थ नसता एव हे पद ऐशी ठिकाणी निरर्थक वापरले आहे. संबोधनार्थ निरर्थक विशेषणे घातली आहेत. एकीकडे शब्द निरर्थक घातले तर दुसरीकडे आवश्यक शब्दांची अपेक्षा असता ते वगळले आहेत. रसभरित अशी वर्णने कोठेच नाहीत व ती तर काव्यात अवश्य हवीत. गीतेत तत्त्वज्ञान सांगितले असेल पण उत्प्रेक्षा दृष्टांत अशा रूपाने ते सांगितलेले नाही. तिजमध्ये पहावे तर युक्ति- वाद आहे अनुमानपद्धति आहे पण प्रतिभाजन्य अद्भुत कल्पना नाहीत. उदात्त वर्णन करण्याला आत्म्यासारखा दुसरा विषय कोणता असणार ? पण तत्संबंधी गीतेतील श्लोक फारच किरकोळ व तुटपुंजे असे आहेत. कालिदास भवभूति शेक्सपियर शेले यानी हे वर्णन अधिक चांगले केले असते. विभूतिवर्णनात तारतम्य काहीच ठेवले नाही. लहानमोठ्यांची सरमिसळ झालेली आहे. अनुप्रास साधण्याकरिता भलत्याच शब्दांच्या जोड्या एकत्र बांधल्या आहेत. सुव्यवस्था अशी कोठेच नाही. श्लोक पुरा झाला म्हणजे झाले. मग कोठला चरण कोठे का बसेना ! विश्वरूपदर्शनात क्षुद्र गोष्टी घुसडून दिल्या आहेत. साधा व्यंकटेश- स्तोत्रकार व मिल्टन याना विश्वावर रचलेली विश्वे दिसली तीहि गीताग्रंथ- काराला दिसली नाहीत. तात्पर्य गीतेत प्रतिभा नाही कल्पना नाही भाषासौंदर्य नाही शुद्ध व्याकरण नाही मिळून काहीच नाही. केवळ श्रद्धेमुळे गीता हा ग्रंथ आदरणीय म्हटला तर म्हणावा. " अशी टीका करून प्रो. राजवाडे हे शेवटी म्हणतात, श्रद्धाळु लोकांची भावना दुखविण्याकरिता मी हे लिहिलेले नाही. पण गीता हे काव्यातील उत्तम काव्य व नीतिशास्त्रावरील सर्वोत्कृष्ट ग्रंथ अशी भूमिका जेव्हा कोणी घेतात व तिचे समर्थन युक्तिवादाने किंवा टीकेने करू पाहतात तेव्हा त्यांच्यावर अशी टीका करणे प्राप्तच होते. त्यानी मी दाखविलेले दोष नाहीत असे सिद्ध करावे असे माझे त्याना आव्हान आहे. जे यश कालिदासा- दिकाना मिळाले ते तुमच्या व्यासाला का मिळू नये ? माझे म्हणणे असे की पूर्वी ८८