पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ७ गीतारहस्यावरील अभिप्राय व टीका ४७ रंगामध्ये यद्यपि आपली विचारसरणी भिन्न आहे तथापि व्यवहारात फरक पड णार नाही असे आपण प्रसिद्ध केलेल्या गीतेच्या प्रवचनावरून मला वाटले होते. व त्याच दृष्टीने मी आपले पुस्तक वाचीत आहे. आपला बहुश्रुतपणा असामान्य आहे. यद्यपि त्याचा विनियोग कसा करावयाचा यात तीव्र मतभेद पडेल तथापि आपल्या अगाध वाचनाची व त्याचा उपयोग वकिली थाटाने करण्याची आपली बुद्धिह कौतुकास्पद आहे असे सर्टिफिकीट देण्याचा जरी मला अधिकार नाही तथापि तेहि देतो. " प्रोफेसर वैजनाथ काशिनाथ राजवाडे यानी तर टिळकांचा सूड त्यांच्या गीतारहस्यावर न उगवता भगवद्गीतेवरच उगवून घेतला आहे. त्याचा प्रकार असा. टिळकांच्या गीतारहस्यातील पहिल्या प्रकरणात विषयप्रवेश करिताना टिळकानी गीतेचे महत्त्व वर्णिले आहे. व ते वर्णन करिताना असे म्हटले आहे की "गीता हा ग्रंथ परमपुरुषार्थांची ओळख करून देणारा, आत्मविद्येची गूढ तत्वे स्पष्ट करून सांगणारा, भक्ति ज्ञान व्यवहार यांची सांगड घालून कर्तव्याला प्रवृत्त करणारा, व मनाला शांतता मिळवून देणारा असा आहे. पण काव्य या दृष्टीने दि जरी त्याचे परीक्षण केले तरी आत्मज्ञानाचे गहन सिद्धांत प्रासादिक भाषेने आबालवृद्धाना सुगम करणारा हा ग्रंथ उत्तम काव्यात गणला जाईल.” हे स्तुतिपूर्ण वर्णन प्रोफेसर राजवाडे याना खपले नाही. म्हणून गीतारहस्य प्रसिद्ध झाल्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे १९१७ साली कै. डॉ. भांडारकर यांच्या वयाला ८० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन व्यक्त करण्याकरिता 'भांडारकर संशोधक मंडळा'ने प्रबंधा- वलीचा एक मोठा ग्रन्थ प्रसिद्ध केला त्यात, संस्कृत वाङ्मयासंबंधाने अनेक विषयावर निरनिराळ्या विद्वानानी लेख लिहिले आहेत. त्यातच राजवाडे यानी गीतेवर एक लेख लिहिला आहे. त्यात त्यानी गीतेचे परीक्षण वाङ्मयशास्त्र व व्याकरणशास्त्र यांच्या दृष्टीने केले आहे. या लेखाच्या पहिल्याच वाक्यात असे म्हटले आहे की " गीता हा ग्रन्थ तत्त्वज्ञानपर किंवा नीतिशास्त्रपर असून शिवाय जगातील उत्कृष्ट काव्यापैकी तो एक आहे असा हक्क कित्येक लोकाकडून पुढे आणण्यात येतो. म्हणून हा हक कितपत साधार किंवा न्याय्य आहे याची चर्चा मी या लेखात करितो. "" गीता हे उत्तम काव्य म्हणणाच्या टिळकांचा प्रत्यक्ष उल्लेख यात नाही. तथापि राजवाडे यांची टीका लिहून होत असताना त्यांच्या डोळ्यापुढे टिळक व त्यांचे गीतारहस्य हा ग्रंथ होता यात मुळीच शंका नाही. राजवाडे यांची टीका प्रत्यक्ष गीतारहस्य या ग्रंथावर नसल्यामुळे तिचा विशेष परामर्ष या ठिकाणी घेण्याचे आम्हाला कारण नाही. तथापि टिळकांच्या गीतारहस्याने लोकमत कित्येक ठिकाणी किती मूळापासून ढवळून काढले होते हे लक्ष्यात यावे एवढ्याकरिता या टीकेतील १०-२० वाक्ये आम्ही खाली देतो. राजवाडे म्हणतात:-