पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४६ लो० टिळकांचे चरित्र भाग ७ रावर ते मुलूख मैदान सोडून टीकाकारांचा उपहास करितात ! टिळकानी घेत- लेल्या आधारभूत संस्कृत वचनांचा अर्थ त्याना लागला नव्हता. कित्येकांचे भाषां- तर चुकले आहे. आणि कित्येक ठिकाणी टिळकांचा अर्थ घेतला तर भगवान् श्रीकृष्णच असंबद्ध प्रलाप करणारे होते असे ठरेल. तात्पर्य अमुक एका बाजूने गीतारहस्यावर आक्षेप घेता येणार नाहीत अशी बाजू त्यानी ठेवलेलीच नाही. किंबहुना असेहि म्हणता येईल की "टिळकानी पाच चार हजार रुपये देऊन तुम्हाला गप्प बसविले व तुमची मुग्ध अनुकूलता मिळविली" हा आरोप जितक्या प्रकारानी खोटा ठरविता येईल तितक्या प्रकारानी लेले शास्त्री यानी गीतारहस्याला नावे ठेऊन त्यातील दोष दाखविले आहेत ! एवढ्याने समाधान न होता बापट शास्त्रया- प्रमाणे लेले शास्त्री यानीहि अर्थासह गीता प्रसिद्ध करण्याचे योजले. गीतारह स्याचे खंडन भरतखंडातील लोकानी करावे म्हणून ते एका संस्कृत ग्रंथाच्या रूपाने सर्व हिंदुस्थानभर प्रसिद्ध करण्याचा शास्त्रीबुवांचा विचार होता. व त्या लेखांचा पूर्वभाग १९१६ सालच्या मार्च महिन्यात त्यानी पुणे येथील 'वाग्वर्धिनी' सभेमध्ये वाचूनहि दाखविला. हे करिताना ज्या विद्वान लोकानी गीतारहस्याचे समर्थन केले त्यांचीहि हजिरी लेले शास्त्री यानी घेतली आहे. उदाहरणार्थ चिंतामणराव वैद्य यानी 'चित्रमय जगता'त गीतारहस्यावर टिळकाना उघड अनुकूल असा एक लेख लिहिला त्यावर लेले शास्त्री यानी खालील शब्दानी टीका केली आहे. "गीता- भाण्यातील सिद्धान्त रा. ब. वैद्याना न कळणे स्वाभाविक आहे. पण वाचकानी मात्र तसे समजणे योग्य नव्हे. प्रत्येक परीक्षेत बक्षिसे मिळविलेल्या रावबहादूरासारख्या जंगी एम्. ए. एल्. एल्. बी. ना शारीरभाष्य समजणे शक्य असते तर मोठमोठ्या कॉलेजातून विद्यार्थ्यांना नव्हे परंतु प्रोफेसर लोकाना विषय समजावून सांग- ण्याकरिता शास्त्री लोक ठेवण्याचे काही प्रयोजनच उरले नव्हते.” वरील अवतरण देण्याचा आमचा हेतू इतकाच की गीतारहस्यावर अनुकूल प्रतिकूल टीकेचा वाद सुरू झाल्यानंतर लवकरच या धार्मिक विषयाला सामान्य राजकीय विषयाचे स्वरूप आले. बापट शास्त्र्यांची टीका केवळ टिळकानी शंकराचार्यावर टीका केली या रागामुळेच प्रवृत्त झालेली होती. पण भाऊ शास्त्री लेले यांची टीका म्हणजे वाऱ्याच्या वावटळीसारखी असावयाची. ती कोणीकडून येईल कोणीकडे जाईल कोणावर हल्ला करील कोणाला जाता जाता विनाकारण धक्का देईल व कोणाविषयी किती क्षुद्रता बुद्धि प्रगट करील याचा नेमच नव्हता. आणि त्याप्रमाणेच त्यांची या विषयावरील टीका अनुभवास आली. आता नव्या पद्धतीच्या चिकित्सक टीकाकारांकडे वळू. गीतारहस्यासंबंधाने प्रोफेसर भानू यानी टिळकाना तारीख ८ जून १९१५ रोजी खालीलप्रमाणे पत्र लिहिले आहे. 66 'आपण कृपा करून माझ्याकडेहि आपले गीतारहस्य पाठविले याबद्दल आपला फार आभारी आहे. पुस्तकाचे बाह्यांग पुष्कळच चांगले आहे. अंत-