पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ७ गीतारहस्यावरील अभिप्राय व टीका ४५ तीहि टिळकाना अनुकूल अशी भासणारीच दिली आहेत. पण ते करिताना शंकराचार्यांचे मत बरोबर नाही असे आम्ही कोठे म्हटलेले नाही. अर्थात् टिळकांच्या ग्रंथावर टीका करावयाची तर त्याना अनुकूल बचने कोणती ही सर्व आधी पाहून पारखून घ्यावी ती नीट लावावी, व अशा रीतीने अनुकूल असणारी सर्व बाजू लक्षात घेऊन नंतर मग त्याच्यावर टीका केली तर ती अधिक खंबीर होते. म्हणून सकृद्दर्शनी टिळकाना अनुकूल असे मत मी प्रगट केले " असा त्यानी खुलासा केला. या द्राविडी प्राणा- यामाला एक मौजेचे कारण घडले होते असे दिसते. द्रव्यलोभाचा आरोप हा ह्या जगात प्रतिपक्षावर करण्याच्या आरोपात पहिल्या नंबरचा गुणकारी असतो. त्याप्र- माणे टिळकांवर टीका करण्याला बापटशास्त्री याना कोणी संस्थानिकाने पैशाची मदत केली हा आरोप जसा त्यांच्यावर काही लोकानी केला तसाच, भाऊशा- स्त्रयानी प्रथम टिळकाना अनुकूल असा लेख लिहिलेला पाहून तोच आरोप बाप- शास्त्रयानी लेलेशास्त्रावर केला व असे सुचविले की टिळकानी लेलेशास्त्रयाना पाच चार हजार रुपये दिले म्हणून ते गप्प बसले व त्यानी गीतारहत्याला मान्यता दिली. बापटशास्त्रयांच्या ग्रंथातील एक उतारा पूर्वी दिला आहे त्यात 'गीतारहस्याचे सम- र्थन केल्याने दृश्यफल मिळण्यासारखे होते,' असे जे एक विधान आहे त्याचा उल- गडा या आक्षेप - प्रत्याक्षेपाने होईल. वरील प्रकारचा खुलासा करून भाऊशास्त्री यानी गीतारहस्यावर टीका करण्याला प्रारंभ केला. ही टीका पुढे कित्येक दिवसपर्यंत सुरू होती. लेलेशास्त्री यांचे म्हणणे असे की शंकराचार्यांचे गीताभाष्यच बरोबर आहे. व टिळकानी गीतारहस्यातील मजकूर समजून उमजून विपरीत लिहिला नसला तरी तो ठिकठिकाणी विपरीत म्हणून खोडून टाकला पाहिजे. हे काम सौम्य शब्दात करावयाचे असा त्यांचा प्रथम संकल्प होता. पण पुढे लवकरच तो सुटला व आपल्या स्वभावाप्रमाणे त्यानी टिळकांवर कडकशब्दयोजना करिताना बापट - शास्त्रयानाहि मागे टाकले आहे. त्यानी टिळकांच्या ग्रंथातील निरनिराळी वचने एकत्र करून त्यांची विसंगति दाखवली. आपण स्वतंत्र विचारपूर्वक गीतेची अनेक पारायणे केली या टिळकांच्या विधानाचा त्यानी उपहास केला. नीटसा बोध न होण्यासारखी अनेक विधाने टिळकानी केली असे म्हटले आहे. टिळक हे ग्रंथात लिहिलेल्या मजकूरातून कोठेहि बांधले जाऊ न शकण्यासारखे म्हणजे 'धंदेवाल्या साक्षीदारा'प्रमाणे मोघम अनेकार्थी शब्दयोजना करतात ! ग्रंथात नडले तर टीपेकटे बाट दाखवतात टीपेत नडले तर अंधावर सावरून घेतात. 'पण किंवा ' असल्या शब्दांच्या आधाराने पळवाट निर्माण करून ठेवतात. आपल्याला अनुकूल असतील तेवढेच शब्द जमेला धरतात. बाकीच्यांचा खुलासा करीत नाहीत. त्यांची भाषाहि कित्येक ठिकाणी शुद्ध नाही. शब्दयोज- नेमध्ये धरसोडीचा प्रकार फार झाला आहे. हाती केसरी आहे म्हणून टीकाका- टि० उ...४०