पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४४ लो० टिळकांचे चरित्र भाग ७ बापटशास्त्र्यांच्या नंतर प्रतिकूल टीकाकारांत वाईचे भाऊशास्त्री लेले यांचा क्रम लागतो. लेलेशास्त्री यानीहि गीताभाष्याचे अध्ययन चांगले केलेले होते. गीतारहस्याची लेखी प्रत लेलेशास्त्री यानी वाचली होती आणि बऱ्याच उपयुक्त व मार्मिक सूचनाहि केल्या होत्या' असा टिळकानी ग्रंथाच्या प्रस्तावनेत त्यांचा उल्लेख केला आहे. तथापि या ज्या सूचना त्यानी टिळकाना केल्या त्या टिळकांच्या दृष्टीने केल्या असे म्हणावे लागते. निदान त्या करिताना विरोधक टीकाकाराची भूमिका लेले शास्त्र्यांच्या मनात विशेष स्पष्टपणाने प्रकट झाली नव्हती. लेले शास्त्री हे एक खंदे लेखक होते. त्यांचा लेखनव्यवसाय जसा मोठा जबर तसा त्यांचा युक्तिवाद व भाषाहि उघड व अप्रतिहत असे. शिवाय भाषेचा कडक - पणा खवचटपणा वाटेल त्यावर व वाटेल तसे तोंड बेगुमान टाकण्याची त्यांची सवय या सर्व गोष्टी लक्षात घेता त्यानी गीतारहस्यावर जी टीका केली ती त्यांच्या नेहमीच्या मानाने पहाता बरीच सौम्य होती असे म्हणण्यास हरकत नाही. 'धर्मनिबंधमाला' या मासिक पुस्तकाच्या पहिल्या अंकात 'भगवान श्रीशंकराचार्य व लोकमान्य टिळक' या मथळ्याखाली त्यानी लेखमाला सुरू केली आणि पुढे पाचव्या अंकापासून कित्येक अंक त्यानी गीतारहस्याच्या परीक्षणाने भरून काढिले आहेत. तेव्हा अशा टीकाकाराचे म्हणणे गीतारहस्या- संबंधाने काय आहे हे थोडक्यात दिले पाहिजे. लेले शास्त्री लिहितात 'गीतेचे रहस्य टिळकानी काढले ते शंकराचार्यांच्या रहस्याहून एका गोष्टीत भिन्न होते. पण टिळकांचा शंकराचार्यांशी जो विरोध होता तो सप्रमाण आहे व त्यामुळे समाजाचे काहीएक नुकसान न होता झाला तर फायदाच होणार आहे. वर्णाश्रम- विहित कर्म केल्याशिवाय अंतःकरण-शुद्धि नाही व त्या शुद्धीशिवाय ज्ञानप्राति नाही व ज्ञानप्रातिशिवाय मोक्ष नाही हा शंकराचार्यांचा सिद्धांत टिळकानाहि मान्य आहे. परंतु शंकराचार्यांचे जे मत टिळकाना मान्य नाही ते हे की संन्या- साश्रम स्वीकारल्याशिवाय मोक्ष प्राप्त होण्याचा संभव नाही. फक्त टिळकांचे म्हणणे असे की ज्ञानोत्तर संन्यासाश्रमाने मोक्षप्राप्ति होईल तशीच ज्ञानोत्तर कर्मा- नुष्ठानानेहि होईल. टिळकांचे हे मत जुन्या शास्त्रीलोकाना मान्य होणे शक्य नाही. परंतु ज्या श्रुतिस्मृति प्रमाणांवरून टिळकांचे हे मत झाले होते ती प्रमाणे मात्र जुन्या पंडिताना खोडता येणे शक्य नाही. उलट खुद्द शंकराचार्यांचे जे मत आहे ते जुन्या मताच्या पंडिताना व शंकराचार्यांच्या अनुयायाना सर्वस्वी मान्य आहे." अशा रीतीने जुन्या पंडितांचा आचार्याशी कांही मुद्यावर विरोध व टिळ- कांचा आचार्यांशी काही मुद्यावर अविरोध, त्यानी दाखविला. पण गीतारहस्य-परी- क्षणांत त्यानी गीतारहस्याच्या विरोधाला प्रारंभ केला व पूर्वीच्या लेखाबद्दल असे म्हटले की "टिळकांनी आपल्या ग्रंथाची हस्तलिखित प्रत आम्हाला दाखविली त्यावेळी ज्या सूचना टिळकांच्या मताला अनुकूल होण्यासारख्या होत्या त्याच त्याना केल्या. तसेच पहिल्या लेखात टिळकाना अनुकूल अशी वचने आम्ही दिली