पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ७ गीतारहस्यावरील अभिप्राय व टीका ४३ एवढ्याने हि न भागता त्यानी गीताभाष्यार्थ अर्थात रहस्यपरीक्षण या नावाचा पूर्वी सांगितलेला प्रचंड ग्रंथ १९२१ साली प्रसिद्ध केला. त्यात गीतारहस्यातील जवळ जवळ शब्दान् शब्द खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे असे म्हणण्यास हर- कत नाही. इतर रीतीते टिळकांविषयी आदरबुद्धि किंबहुना पूज्यभाव असताहि विषयानुरोधाने टीका करण्याचा प्रसंग आला असता भाडभीड न धरता जशास तसे उत्तर देण्याचे एक नमुनेदार उदाहरण बापटशास्त्री यांचे होय. पण या टीके- तील प्रखर असा जो भाग आहे त्याचे कारण, बापटशास्त्री यांच्या म्हणण्याप्रमाणे, स्वतः टिळकानी शंकराचार्यावर टीका करिताना जो प्रखरपणा दाखविला तोच होय. बापटशास्त्री यांचे म्हणणे असे की "टिळकानी संन्यास मार्गीय टीकाकारांचे नाव पुढे करून आचार्य भाष्यावरच दोषारोपाचे सर्व हल्ल केले आहेत. तसेच गीतेला कर्मयोगशास्त्र हे नाव देऊन नवीन शास्त्र किंवा सांप्रदाय बनविण्याचा वृथा प्रयत्न त्यानी केला आहे. आणि पुष्कळसे लोक टिळकांच्या नव्या ग्रंथाला जो मान देतात तो त्यांच्या इतर गुणावर व योग्यतेवर भुलून केवळ पक्षपाताने व विषयाच्या अज्ञानामुळे देतात. " ते म्हणतात " गीतारहस्याच्या अनुकूल बोलणे सोपे आहे व ते दृष्टफल देणारे आहे! टिळकांच्या प्रतिपक्षीयाना त्यांच्यावर टीका करण्याला योग्य तो वाव किंवा संधि मिळत नाही. टिळकांचा जन्मसिद्ध विषय राजकारणाचा. पण जो त्यांचा जन्मसिद्ध विषय नव्हे त्यात त्यानी वृथा प्रवेश करून व निराधार सिद्धान्त प्रतिपादन करून आपल्या विषयीची आदरबुद्धि गमा- वली व अप्रीतिला प्रात्र झाले ! गीतारहस्य हे त्यानी उगाच फावल्या वेळी दुसरे काही काम नाही म्हणून केलेले काम आहे. म्हणून त्याची योग्यता तितपतच. वाईट इतकेच की त्यांच्या उदाहरणाने व उत्तेजनाने ज्या लोकाना पूर्वी शंकराचार्या- विरुद्ध लेखणी किंवा जीभ उचलण्याला छाती नव्हती त्या लोकाना सहजच सवड मिळाली. टिळकाशिवाय दुसऱ्या कोणी गीतारहस्य लिहिले असते तर जनतेने त्याची उपेक्षाच केली असती. असल्या योग्यतेच्या ग्रंथाला लोक 'ग्रंथराज' म्हणू लागले हा केवळ कालमहिमा व व्यक्तिमहिमा होय ! किंबहुना टिळकांची गौतम- बुद्धाच्या अल्प प्रमाणात नवी आवृत्ति आहे. गीतारहस्याचा उपयोग इतकाच की सुशिक्षित लोक गीतेपासून पूर्वी पराङ्मुख झाले होते, तरी त्यांचे तोंड आता या ग्रंथाकडे वळण्याला थोडीशी मदत झाली. व ज्यानी गीताभाष्याचे अध्ययन करण्यात जन्म घालविला त्यानाद्दि गीतारहस्याला उत्तर देण्याकरिता अधिक खोलात जाऊन अधिक अभ्यास करावा लागला. टिळकानी सांप्रदाय तर सोडलाच पण पाश्चात्यांचा चष्मा लावून गीतेकडे पाहिले यामुळे त्यांचा ग्रंथ पदोपदी आक्षेपार्ह झाला आहे." बापटशास्त्री टिळकाना येऊन जाऊन भलेपणा देतात तो इतकाच की ' या ग्रंथात टिळकांचा बहुश्रुतपणा दिसून येतो व आपल्या पक्षाचे समर्थन कर- ण्याची त्यांची शैली इतकी विलक्षण आहे की उत्तर देताना प्रत्येक मुद्याचा विचारच करावा लागतो ! '