पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४२ लो० टिळकांचे चरित्र भाग ७ आठवड्यात महाराष्ट्राच्या पुन्हा कानावर आला. कर्तव्या कर्तव्याच्या व्यामोहात पडलेल्या अर्जुनास छिन्नसंशय करून त्यास जन्म सार्थक्याचा मार्ग दाखविणारी कृष्णवाणी गेल्या आठवड्यात पुन्हा जागृत झाली. गीताक्षरांचे अक्षरत्व गेल्या आठवडयात पुन्हा प्रस्थापित झाले. गीता-वाक्याना गेल्या आठवड्यात फिरून वाचा फुटली. गीतार्थ संदोहनाच्या अमृतधारा गेल्या आठवड्यात पुन्हा वर्षावृ लागल्या. इतके दिवस फक्त आकाश - जीवनाच्या दृष्टीसच आरंभ करणाऱ्या मृग- नक्षत्राने गेल्या आठवड्यात आपली प्रतिवार्षिक जलसेवा थाम्बवून प्रथम गीता- न्तर्गत ज्ञानजीवनाच्या मृग-झडीस आरंभ केला. जलवृष्टीच्या कार्याची प्रतिवर्षी चिन्ता वाहणाऱ्या त्र - हत्या इन्द्राने गीतार्थ - तुंदिल ज्ञानमेघाना पाहून आपले जल - मेघ व्योम मार्गातून एक क्षणभर दूर केले. पर्जन्यवृष्टीच्या कृष्णमेघानो, ह्या महाराष्ट्राला जल - वर्षावापेक्षा ज्ञान-वर्षावाची जास्ती अवश्यकता आहे अशी तुम- चीहि समजूत झाली काय ? अचेतन वापीना आणि चंचल नद्याना भरपूर भरून टाकून क्षार जलाची भरती करण्यापेक्षा महाराष्ट्रातील चेतन परंतु निश्चल लोकप्र- वृत्तीत ज्ञानाचे जीवन ओतणे हेच तुम्हास जास्ती महत्त्वाचे वाटले काय ? निस- र्गतः मृदु व कृष्णा-वेण्यासारख्या पवित्र सरितांच्या योगाने तर जास्तीच मृदुहृदय झालेल्या ह्या महाराष्ट्र भूमीत आकाशातील पाणी वाटेल तसे बेअंदाजाने ओतून कर्दम व पंक ह्यांचीच निष्पत्ति करण्यापेक्षा, अज्ञानाच्या योगाने पाषाणतुल्य बन- लेल्या महाराष्ट्रीय लोकांच्या अन्तःकरणावर स्वर्गातील बोधामृताचा मारा करून त्याना पाझर फोडणे हेच तुम्हाला आपले सद्यः कर्तव्य वाटले काय ? खरोखर तुम्हांस जर असेच वाटले असेल तर तुम्ही महाराष्ट्राची स्थिति बरोबर ओळखलीत, तुम्हाला महाराष्ट्राच्या अवश्यकतेची खरी जाणीव झाली, भगवद्गीतारहस्य तुम्हाला खरे समजले ! " प्रतिकूल टीकेत वरील स्तुतिप्रमाणे निंदेचा एकाच ठिकाणी मारा केलेला असा लेख सापडत नाही तथापि ग्रंथकार व ग्रंथ यांच्याविषयी जे शेलके शब्द वापरण्यात आले आहेत त्यांची कंथा बनविली असता ती त्या दोघानाही पुरून उरेल इतकी मोठी होईल. गीतारहस्याच्या टीकाकारामध्ये सर्वात प्रमुख स्थान पुण्याचे आचार्यभक्त विष्णुशास्त्री बापट याना दिले पाहिजे. यांचा बहुतेक जन्म शंकराचार्यांच्या ग्रंथाचे पठन व पाठण करण्यात गेला. व आचार्य या नावाचे मासिक पुस्तक काढून त्यानी आपली आचार्यभक्ति विशेष रीतीने प्रगट केलेली होती. टिळकानी मंडा- लेहून परत आल्यावर गीतारहस्य छापण्यापूर्वी गायकवाडवाड्यात गीतारहस्यावर चार व्याख्याने दिली. पण त्याबरोबर पाचव्याच दिवशी त्याच जागी स्वतः टिळ- कांच्याच अध्यक्षतेखाली बापटशास्त्री यानी व्याख्यान देऊन गीतारहस्यावर आक्षेप प्रगट केले. नंतर शांकरभाष्यानुसार गीतारहस्य सांख्ययोग शास्त्र वगैरे लेख लिहून व पुस्तके प्रसिद्ध करून त्यानी गीतारहस्यावर आणखी पद्धतशीर टीका केली. पण