पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ७ गीतारहस्यावरील अभिप्राय व टीका ४१ समर्थनपर लेख लिहिण्याला पुढे आला. नाही असे नाही. पण प्रत्यक्ष लेख लिहिणारात प्रतिकूल टीका करणारेच अधिक. इतकी प्रस्तावना करून या ग्रंथावरील साधक बाधक टीकेचे काही थोडे नमुने या खाली देतो. या नमुन्यांची वर्गवारी लाविली असता असे आढळून येईल की काही थोडे निवळ बौद्धिक टीकाकार आहेत. पण पुष्कळसे भावनाप्रधान आहेत. पण त्यांतहि एक पोटभेद असा की बौद्धिक म्हणजे अश्रद्धावान अशा टीकाकारानीदेखील पुष्कळ ठिकाणी विकारवश होऊन स्वतः टिळक किंवा वेदांत किंवा हिंदु धर्म यांच्याविषयी नापसंतीची भावना उत्कट रीतीने प्रकट केली आहे. तशीच उलट श्रद्धाळू व भावना- प्रधान टीकाकारामध्येहि ग्रंथसंगति लाविताना अर्थ करताना किंवा अनुमान रचिताना काहीनी पुष्कळच चिकित्साबुद्धि व शुद्ध तर्कप्रेम दाखविले आहे. या उभय टीकाकारात जसे सात्विक रजोगुणी व तामस टीकाकार आहेत तसेच सांप्रदायिक किंवा बुद्धिस्वातंत्र्याविषयी प्रेम बाळगणारेहि टीकाकार आढळतात. कारण सांप्रदाय म्हटला म्हणजे त्याचा प्रकार एकच. मग तो पुराणमतवादी असो किंवा नवमतवादी असो. तसेच अनुकूल टीकेत काही टीका इतक्या वीट येणाऱ्या स्तुतीच्या आहेत की सुगंधी हे नाव घेऊन एक मैलावरून कपाळ उठ- विणाऱ्या किंवा वांति करविणाऱ्या दर्पयुक्त जर्मन सेंटची किंवा ओटो दिल- बहारच्या कार्डाचीच उपमा त्याना साजेल. उलट प्रतिकूल टीकेतहि असे काही मासले आढळले की जणू काही डिकेमाली किंवा आयडोफार्म यांच्या रसाने बनवि लेल्या शाईतच वरचेवर लेखणी बुडवून लेखकाने लिहिले असावे. अतिशयोक्तिपूर्ण स्तुतीचा नमुना पाहिजे असेल तर मुंबईच्या एका पत्रा- तील खालील उतारा वाचा:- " लो. टिळकांचा गीतारहस्याचा हा ग्रंथ प्रकट झाला. ज्या ग्रंथाने एक। असामान्य विद्वान् पुरुषाच्या बुद्धि-कुक्षीत सहा वर्षे गर्भवास केला त्याने महाराष्ट्र- वाङ्मयाचा पाळणा गेल्या आठवड्यात पाहिला. ज्या ग्रन्थरवीची अरुण प्रभा आपल्या रुचिर कल्पना - कान्तीने गेली दोन वर्षे महाराष्ट्रावर मन्द परन्तु सौख्यकर प्रकाश पाडीत होती त्या बालसूर्याने मुद्रणकल्पाच्या उदय-गिरीवरून गेल्या आठ- वड्यात आपले कमनीय शीर्ष व्यक्त केले. ज्या कोहिनूर हिऱ्यावरील सन्देहस्थि- तीच्या पेटीचे झाकण एक वर्षापूर्वीच उघडले गेले होते त्याचेवरील मुद्रणसंस्का- राचे किनखाबी वेष्टन गेल्या आठवड्यात दूर सारले जाऊन त्याचे नेत्रानन्दकारक तेज झळकू लागले. भगवान् श्रीकृष्णाच्या मुरलीचा ध्वनि ज्ञानेश्वर आणि वामन- पण्डित ह्यांच्या वेळेपासून ह्या महाराष्ट्रात घुमण्याचे जे बन्द पडले होते त्याला गेल्या आठवड्यात पुन्हा सुरवात झाली. नन्दकिशोराची जी हृद्यवेणुगीते पूर्वी यमुना- तटावरील गोधने व खिल्लारे ह्यांच्या कर्णप्रान्तावर आदळून त्यानाही सहजानन्द- स्थिति प्राप्त करून देत असत त्या वेणु-गीतांचा उत्साह - प्रवर्तक-नाद गेल्या