पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग १ १९१४-१९१५ मधील निवडक पत्रे ४५ (२४) ग. गो. नवरे यांचे केळकराना पत्र मुंबई २९ जून १९१५ आमचे शेटजी अमृतलाल यांच्या चिरंजीवानी टिळकाना एक पत्र लिहिले आहे. त्यातील मुख्य मुद्दा असा की गीतारहस्याचे गुजराथीत भाषांतर होऊन गुजराथी वाचकाना मिळावे. व त्याकरिता जरूर लागल्यास आपण खर्चहि करू. चिरंजीव हे टिळकासंबंधाने अत्यंत भक्ति बाळगणारे आहेत. त्यांचेच स्नेहाने आपणास पूर्वी कळविलेले व्रत म्हणजे टिळक परत येईपर्यंत विडा न खाणे हे पाळिले होते. सदरहू (२५) टिळकांचे जिना यांना पत्र पुणे २१ जुलै १९१५ गेल्या आठवड्यात तुमचे आमचे बोलणे झाले. त्यावरून तुम्हाला कळ- वितो की काँग्रेस घटनेचे पहिले कलम मान्य करण्याला व ते पाळण्याला मी व माझी स्नेही मंडळी तयार आहेत. आमचे मतच त्या कलमाहून वेगळे नाही. व १९०६ साली काँग्रेसमध्ये तशा अर्थाचा ठराव आला त्याला आम्ही मत दिले होते व त्या पलीकडे यत्किंचितहि आमचा राजकीय कार्यक्रम जाणारा नाही. तसेच काँग्रेसचे काम नीट चालण्यास त्याला नियम पाहिजेत हीहि गोष्ट आम्हाला मान्य आहे. आमच्या मताचा काही लोक विपर्यास करतात. स्थिति अशी आहे की या इलाख्यातील काँग्रेसचे काम सर्व्हन्ट ऑफ इंडिया सोसायटी व मुंबई प्रां. कमिटी यांच्या हाती आहे. व नियम असे केले आहेत की त्याना नको ते लोक ते निव- डून देणार नाहीत व नको त्या संस्था जोडून घेणार नाहीत. आम्हाला पाहिजे ते हे की कोणत्याही संस्थेने आम्हाला जोडून घ्या म्हटले म्हणजे मग प्रां. काँ. कमि- टीला नाही म्हणण्याचा अधिकारच असता कामा नये. व त्याहिपेक्षा अधिक चांगली योजना म्हणजे जाहीर सभाना निवडणुकीचा हक्क द्यावा. त्याना वाटते की आम्ही बहुमताचा गहजब करूं. पण नियमातच असे आहे की एखाद्या प्रांतातून प्रतिनिधी वाटेल तितके आले तरी काँग्रेसमध्ये मते प्रांत- वार घ्यावी व प्रत्येक प्रांताच्या मताला अमुक इतके गुणांक आहेत असे समजावे. आमच्याविरुद्ध बहुमत असेल तर ते आम्ही मान्य करू व ते आमच्या बाजूला मिळण्याची खटपट करू व वाट पाहू. पण भांडून राष्ट्रीय सभा सोडून जाणार नाही. दुसऱ्या बाजूच्या लोकात सहिष्णुता मुळीच नाही व आम्ही आपली सर्व स्वतंत्रता घालवावी असे त्यांचे मत आहे. हा अर्थ मनात ठेवून तोंडाने म्हणतात की घटनेचा खरा उद्देश राष्ट्रीय पक्षाला मान्य नाही. जणूं काय घटनेचा खरा उद्देश हे लोक म्हणतील तोच. मी हे मुद्दाम लिहून तुम्हाला कळवीत आहे. कारण त्यामुळे जो कोणाचा गैरसमज तिकडे असेल तो याने दूर होईल.