पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ७ गीतारहस्यावरील अभिप्राय व टीका ३९ ताहि ग्रंथ कितीहि प्रसादयुक्त असला तरी त्याच्यामध्ये असत नाही. दुसरे पक्षी ग्रंथामध्ये प्रसादाच्या स्वच्छपणापेक्षा प्रतिभेचे तेज अधिक चमकत असेल; तथापि प्रकाशात निरनिराळ्या बाजूनी धरला असता निरनिराळे रंग प्रकट करण्याची जी शक्ति पैलदार हिन्यामध्ये असते ती प्रतिभोद्दीपित ग्रंथात असू शकणार नाही. प्रतिभेची व्याख्या कित्येक साहित्यशास्त्रकारांच्या मताप्रमाणे जरी 'प्रतिक्षणी नवीन काही तरी उन्मेष विकास किंवा रमणीय रूप दाखविणारी शक्ति' अशी असली तरी ग्रंथ म्हटला म्हणजे तो सर्वच काही शब्दश: असा विचित्रदर्शन किंवा अनंत- दर्शन होऊ शकणार नाही. त्यातील मुख्य सिद्धांताच्या आजूबाजूने इतर अनेक सिद्धांत डोके वर काढून दाखवू शकोत. किंवा सुचविले जावोत. पण मूळ ग्रंथ- काराला अभिमत असा काही तरी एक सिद्धांत स्थिर व आधारभूत अशा स्थाणू- प्रमाणे असावाच लागतो. पण आपल्या इकडील काही प्रकारच्या धार्मिक वाङ्मयात सूत्ररूपाने लिहिण्याची पद्धति व त्याच्या जोडीला निरतिशय शब्द- प्रामाण्यवृद्धि असल्यामुळे, एका शब्दातून अनेक लोक आपापल्या परी अर्थ काढण्याचा प्रयत्न करितात. यामुळे त्यांची स्वतःची आणि ते ज्याचा अर्थ करितात त्याची बेसुमार ओढाताण सहजच होते. जुने वैदिक वाङ्मय आज इतक्या दिवसानी शिल्लक उरले हीच मोठी गोष्ट. पण त्याचा अर्थ आजच्या भाषेने लावून दाखविणारे शब्द-कोश किंवा भाष्ये वार्तिके उपलब्ध नाहीत. काही असली तरी ती निराळ्या हेतूने लिहिलेली आहेत. पुढे येणाऱ्या अनंत पिढ्याना मध्यंतरी येणारी गंडांतरे म्हणजे अपभ्रंश लक्षणा रूढी-वगैरे सर्वातून उत्तीर्ण होऊन प्रत्येक पिढीला त्या त्या काळी पटणाऱ्या शब्दानी अर्थ समजावून देण्याकरिता ती लिहिलेली नाहीत खास. यामुळे जुन्या शब्दप्रयोगांचा आम्ही नवीन अर्थ आपल्या आजच्या रूढीप्रमाणे बसविणार. आणि या रूद्रीभेदात मतवैचित्र्याची व हेतुवैचित्र्याची भर पडली म्हणजे मग मूळच्या शब्दार्थात विकृति किती होत असेल हे सांगावयास नको. वेदांतसूत्राचे उदाहरण घेतले तर असे दिसून येईल की एकाच सूत्राचा अर्थ चार मतांच्या भाष्यकारानी चार प्रकारचा लाविलेला आहे. सूत्रे त्रुटित म्हणून कदाचित् ही युक्ति साधली असेल असे म्हणावे तर ज्यात तो दोष नाही अशा सरळ संबंध भरपूर शब्दांच्या वाक्यानी लिहिलेल्या काही प्रमाण ग्रंथांची गोष्टहि तशीच झालेली आहे. व भगवद्गीता हेच त्याचे एक उत्कृष्ट उदाहरण होय. कारण या ग्रंथात शब्द कमी किंवा अपुरे पडले आहेत असा आक्षेप कोणालाहि काढण्याला जागा नाही. उलट शब्दप्राचुर्य व पुनरा- वृत्ति या दोषांचा आरोप करण्यासहि गीतेत थोडीशी जागा आहे. असे असता संक्षिप्त किंवा त्रुटित स्वरूपाच्या वेदांत सूत्रावर जितकी अनेक मतप्रदर्शक भाष्ये झाली आहेत तितकी किंवा त्याहून अधिक सरळ सोप्या प्रासादिक किंबहुना पाल्हाळिक अशा गीतेवर झाली आहेत. व त्याचे कारण अनेक मतांच्या लोकानी