पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३८ लो० टिळकांचे चरित्र भाग ७ परंतु गीतेवर हजार पाचशे पानांचा स्वतंत्र ग्रंथ लिहिण्याइतका व गीतेवर नुसते भाष्यच नव्हे तर तुलनात्मक तत्त्वज्ञानाचा निबंध लिहिण्याइतका असा धर्मवि- पयाचा टिळकांचा अभ्यास होता ही गोष्ट लोकांच्या प्रत्ययाला प्रथमच आली. म्हणून त्यांच्या विद्वत्तेच्या पैलुदारपणाचेच त्याना आश्चर्य वाटले. यानंतरची पायरी एवढा ग्रंथ 'तुरुंगात लिहिला' याबद्दल कौतुक करणारांची. आणि हे त्यांचे कौतुक मात्र खरोखरच योग्य प्रकारचे होते. कारण तुरुंगातून स्मरणाने व शेकडो पुस्तके मागवून ती वाचून असा ग्रंथ लिहिणे ही मोठीच गोष्ट होती. आणि याहि पेक्षा कौतुक करण्याची खरी एक गोष्ट अशी की टिळकानी हा 'सर्व ग्रंथ पेनसि- लीने व स्वहस्ते' लिहिला. जी गोष्ट म्हणजे हाताने मजकूर लिहिण्याची गोष्ट टिळ- कानी जन्मात केली नाही ती तुरुंगात यावेळी केली. तुरुंगात कंटाळा येण्या- इतका वेळ मोकळा होता. तेथे लिहिण्याला लेखकच नव्हता. पेनसिलीनेहि कागदा- वर अक्षर उमटत नाही असे नाही. या सर्व गोष्टी खन्या. पण प्रतिकूल स्थितीत इतर मनुष्य कंटाळतो तसे टिळक कंटाळले नाहीत ही कौतुकाची गोष्ट काही लहानसहान नाही. गीतारहस्यात इतर भाष्यग्रंथावर व टीकांवर स्वतः टिळकानी केलेली प्रतिटीका, त्या टीकेवर टिळकानी दिलेली उत्तरे त्या उत्तरावर इतरानी दिलेली प्रत्युत्तरे, आणि या सर्व वादात पुढे आलेल्या शंका व त्यांचे समाधान, कोट्या व प्रतिकोट्या निंदा व प्रतिनिंदा अपशब्द व प्रत्यपशब्द यांचा संभार इतका मोठा आहे की तो सर्व एकत्र छापला असता जवळ जवळ एक हजार पृष्ठे भरतील. या सर्वांचा परामर्ष स्थूलपणानेहि घेणे या ग्रंथात शक्य नाही. शिवाय तो घेण्याचे फारसे प्रयोजन नाही. कारण आपण इतके खोलात गेलो तरी हाताला काय लागणार ? फक्त चार दोनच महत्त्वाचे मुद्दे. पण तेच इतर रीतीने सांगता येण्यासारखे आहेत. पण वादाचे मुख्य कारण हे की कोणताहि ग्रंथ लाव- ताना मनुष्य असे घेऊन चालतो की लिहिणाराने तो काही एका विशिष्ट हेतूने लिहिलेला असतो इतकेच नव्हे तर त्यातील प्रत्येक शब्द त्या हेतूच्या सिद्ध्यर्थ असतो. या समजुतीत फारशी चूक नाही. पण जेव्हा निरनिराळ्या वृत्तीचे निर- निराळ्या मतांचे लोक प्रामाण्य बुद्धीने त्या ग्रंथाला आदरितात, व तसे करताना तो ग्रंथ आपल्याच विशिष्ट वृत्तीच्या किंवा मताच्या सिद्ध्यर्थ किंवा समर्थनार्थ मूळ लिहिला गेला आहे असे मानून चालतात तेव्हा अनवस्था प्राप्त होते. ग्रंथकाराच्या लिहिण्यात प्रसाद म्हणजे स्वच्छता निर्मळता कितीहि असली तरी ग्रंथ हे चित्र आहे तो आरसा नव्हे. अगदी दोनप्रहरच्या उन्हाचे चित्र किंवा अंधकाराने व्यापिलेल्या गडद आभाळाचे चित्र म्हटले तरी ते कोणत्या तरी एका रंगाने एकजात सारविलेले असणार. त्यात अनेक आकृती फक्त मनाने कल्पण्या- सारखीच भूमिका असते. परंतु आरसा जसा कोणाहि पाहणाराला त्याचेच तोंड बिनचूक प्रामाणिकपणाने व निरपवादरीतीने दाखवू शकतो तसे कर्तृत्व कोण-