पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ७ गीतारहस्यावरील अभिप्राय व टीका ३७ झाली खरी ! आपणासंबंधाने तीव्र लोभाप्रमाणे तीव्र द्वेष लोकांच्या मनात उत्पन्न करण्याची पात्रता टिळकांच्या अंगी होती याचे गीतारहस्यावरील अभिप्राय हे एक प्रत्यंतरच होय. गीतारहस्याची स्तुति करणारामध्ये किती प्रकारचे लोक होते व कोणत्या निरनिराळ्या कारणानी त्यानी गीतारहस्याची स्तुती केली याचा थोडासा खुलासा करून नंतर त्यांच्या टीकाकारांकडे वळू. मात्र गीतारहस्याची स्तुति करणारांपेक्षा त्याची निंदा करणारानी किंवा त्यावर टीका करणारानी तो ग्रंथ अधिक काळजी- पूर्वक वाचला होता यात शंका नाही. असो. स्तुति करणारापैकी पहिला व मोठा वर्ग तो 'ग्रंथ टिळकांचा' म्हणून स्तुति करणारांचा. दुसऱ्या कोणी हा लिहिला असता तर त्याची त्यानी इतकी स्तुति केली नसती. टिळक मोठे त्यांचा ग्रंथहि मोठा. मोठ्या मनुष्याच्या हातून मोठाच ग्रंथ निर्माण व्हावयाचा. ग्रंथ इतक्या महत्त्वाचा नसता तर तो लिहिण्यात टिळकानी आपला वेळ खर्चलाच नसता. वेळ मोकळा असला म्हणून काय झाले ? सिंहाला कितीहि भूक लागली तरी तो काही गवत काडी खाणार नाही. अशा अनुमानिकाना अर्थात् ग्रंथ पाहण्याचेहि कारण नाही. याच्या पुढची पायरी म्हणजे ग्रंथ नुसता पाहून त्याची स्तुति करणारांची. आणि खरोखर गीतारहस्य हा ' ग्रंथ इतका मोठा' आहे की तो नुसता पाहूनहि त्याच्याबद्दल आदरबुद्धि उत्पन्न व्हावी. मराठी भाषेत एका मनुष्याने एकदम लिहिलेला येवढा मोठा ग्रंथ बहुधा पाहावयास सापडत नाही. नाही म्हणावयाला वे. शा. सं. बापट शास्त्री यांचा ' गीताभाष्यार्थ व रहस्यपरीक्षण ' हा ग्रंथ याच विषयावर असून तो याहून सव्वा दीडपट एवढा मोठा आहे. बापट शास्त्री हे गीतारहस्यापुरते टिळकांचे प्रतिपक्षी. त्यांचा जवळ जवळ सर्व जन्म श्रीमदा- चार्यांचे ग्रंथ वाचण्यात व त्यांचे मनन करण्यात गेला. टिळकांच्या गीतारहस्याने परंपरेचा व सत्याचा उच्छेद मांडला असे वाटून प्रतिकार बुद्धीने हा ग्रंथ लिहिण्यास ते प्रवृत्त झाले. आणि थोड्या कालावधीत त्यानी सुमारे १३०० पानांचा ग्रंथ लिहून छापून प्रसिद्ध केला. बापट शास्त्री यांच्या ग्रंथाला त्या ग्रंथाच्या महत्त्वाच्या मानाचे प्रसिद्धी लाभली नाही असे पुष्कळांचे म्हणणे आहे. पण व्यक्तिमहा- त्म्याचे अधिष्ठान ग्रंथाला लाभावे ही गोष्ट स्वाभाविकच आहे. त्याविषयी तक्रार करण्यात अर्थ नाही. शिवाय उपोद्घातरूपाने टिळकानी जी ५००/६०० पाने, गीतेचे भाषांतर टीका व टीपा यांच्या आधी, दिली आहेत त्यांतच खरोखर टिळकांच्या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे. यामुळे बापट व टिळक यांच्या ग्रंथांच्या तुलनेला समान अधिष्ठान आहे असे म्हणता येत नाही. मुख्य मुद्दा हा की एवढा मोठा ग्रंथ पूर्वी कोणाहि ग्रंथकाराने लिहिलेला नव्हता. असो. यानंतरची पायरी म्हणजे एवढा मोठा ग्रंथ 'गीता विषयावर लिहिला' या विषयी कौतुक करणारांची. टिळक राज- कीय विषयावरील वर्तमानपत्राचे लेखक म्हणून लोकाना माहीत होते. धर्मबुद्धीने आस्तिक पुराणमतवादी व वेदशास्त्र पाहिलेले इतकी लोकाना कल्पना होती..