पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३६ लो० टिळकांचे चरित्र भाग ७ विचार करून ती करीत जा, असे गीताधर्म कंठरवाने सांगत आहे. आणि मनुष्यमात्राच्या अंगी असणाऱ्या बुद्धि (ज्ञान) श्रद्धा ( भक्ति) आणि कर्म या तीन वृत्तींची अशा रीतीने जितकी सुंदर जोड घालता येते तितकी दुसऱ्या कोण- त्याहि शास्त्रीय पद्धतीने घालता येत नाही, असे माझे मत आहे. माझ्या ग्रंथाचा सारांश काय हे यावरून सामान्यतः लक्षात येईल. यावर पुष्कळ शंका घेण्या- सारख्या आहेत, नाही असे नाही. कारण निष्काम कर्मयोगाला मी देतो तितके महत्त्व टीकाकार देत नाहीत हे मला माहीत आहे पण माझ्या मतावरील सर्व शंकांची उत्तरे येथे देणे शक्य नाही; त्यासाठी समग्र ग्रंथच वाचला पाहिजे व तो शक्य तितका लवकर प्रसिद्ध करण्याची व्यवस्था मी करीत आहे. थोडक्यात सांगणे असल्यास ब्रह्मविद्यामूलक भक्ति गीतेत प्रतिपाद्य आहे, इतकेच नव्हे तर त्याबरोवर तितक्याच योग्यतेचा निष्काम कर्मयोगहि अवश्यक म्हणून प्रतिपादिला असल्यामुळे गोता हे ब्रह्मविद्यामूलक भक्तिसहचारी नीतिशास्त्र होय असे माझे मत आहे. " (८) गीतारहस्यावरील अभिप्राय व टीका गीतारहस्याविषयी जे निरनिराळे अभिप्राय प्रगट झाले त्यात जमीन अस्मानचे अंतर आहे असे म्हटल्यास खरोखरच यात अतिशयोक्ति होणार नाही. कारण गीतारहस्यात ' दगड देखील ' विशेष काही नाही असे म्हणणारे भेटले ही जमीन ! आणि गीतारहस्य ही 'भगवंताचीच वाणी पुन्हा एक वेळ टिळक मुखातून अवतीर्ण झाली' असे म्हणणारे भेटले हे अस्मान होय ! वस्तुव- र्णन करताना मनुष्य गुणदोषांच्या दृष्टीने ते वर्णन यथार्थ रेखीव मापीव कसे होईल याकडे लक्ष देत नाही. तर आपली भावना अधिकात अधिक ठसकेदार शब्दानी कशी व्यक्त होईल याकडेच त्याचे लक्ष असते. गीतारहस्य हा ग्रंथ गीतेइतकाच पवित्र मानणारानी, तो छापखान्यात बांधविताना पृष्ठभागी त्याला चामड्याचा तुकडा लावला यावद्दलहि टिळकाना प्रेमाने दूषण दिले. आणि आपण घेतलेली प्रत पुन्हा उसवून ती सोवळ्यात वापरण्याकरिता रेशमी पुख्याने बांधवून घेतली. याच्या उलट गीतारहस्याला नावे ठेवण्याच्या भरात केवळ त्यात गीतेला सर्वोत्कृष्ट- पणा दिला तोहि न खपून मूळ गीतेला निकृष्ट व कवडीमोल ठरविण्याचा हिसा- oft कित्येकाना आला. कित्येक भाविकानी असे म्हटले की श्रीकृष्णाचा अवतार तुरुंगाच्या बंदिवासात झाला तसाच गीतारहस्याचा अवतार मंडाले येथील तुरुं- गात झाला हे ठीकच झाले. कारण भारत कालीन पिढीला जसा श्रीकृष्ण हा कर्तव्यप्रेरक झाला तसेच गीतारहस्य हे हल्लीच्या भारतीय पिढीला कर्तव्यप्रेरक होणारे आहे. 'भगवान टिळक' हे नाव एकूण अगदीच फुकट गेले नव्हते ! उलट कित्येक निंदकानी असे म्हटले की तुरुंगवासाने प्राप्त झालेल्या खोट्या मोठेपणामुळे अंगी आलेल्या अहंकारात भर पडण्याला गीतारहस्य ही टिळकाना आणखी एक टूम