पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४४ लो० टिळकांचे चरित्र भाग १ करिता करवीर मठाशी एक होऊन भ्रष्ट झाला असा दुसरा बोभाटा होणार हे दिसत आहे. तथापि आपण लोकमान्य असून जगात आपली कीर्ति व प्रौढता आहे त्या अर्थी आपण कराल ते जगमान्य होईल म्हणून आपल्या सांगण्याप्रमाणे दावा काढून घेण्यास आम्ही तयार आहो. पण या मठाची मान्यता कमी होऊ नये याकरिता प्रतिवादी यानी करवीरचे उत्पन्न घ्यावे व ब्रिटिश इलाख्यातील संस्थानाकडील उत्पन्न आमचेकडे असावे म्हणजे तंटा उरला नाही. व आपण घडवून आणाल तर घडणार आहे. वाटेल तर ते देऊन आणखी थोडे इकडचे द्यावे. पण त्यांचा आमचा संसर्ग तोडावा. कारण त्या मठाकडून जे कर्म झाले ते लोकास मान्य आहेसे दिसत नाही. तसेच प्रतिवादीनी पळशे ब्राह्मणाच्या घरी भोजन केले याबद्दल तंटा अजून सुरू आहे. कोल्हापूरचेच लोक वेदोक्त केल्या- मुळे त्या मठाला भ्रष्ट म्हणतात. अशा स्थितीत त्यांच्याशी आपसात समजूत केली तर हा महि भ्रष्ट होईल. त्यापेक्षा दावा काढून घ्यावा. सर्व उत्पन्न त्या मठाला ' द्यावे आणि भिक्षा व मान्यता कायम राहिली तरी पुरे. त्या मठाशी संगनमतच करावयास सांगाल तर सांगाल तो शिष्य करून देतो आणि आम्ही काशीस जातो. मग तो शिष्य काय हवे ते करो आमच्यावर अपेश नाही. तात्पर्य आम्हास संसर्ग न बाधेल अशी वाटेल ती तोड सांगा. आपण धार्मिक आहात लोकोद्धाराकरिता आपण अवतारी पुरुष आहा अशी आमची पूर्ण समजूत आहे. हा मठ धर्म- स्थितीत राहिल्याने आपणास मोठे पुण्य लागणारे असून आपली कीर्ति होणार आहे. या बाजूने पाहून थोडीशी खटपट कराल तर या स्थितीमध्ये धार्मिक संस्थेस आश्रय दिल्यासारखे होणार आहे. (२३) बेळवी यांचे केळकराना पस बेळगाव १७ जून १९१५ टिळक सिंहगडाहून परत आले काय ? माझ्या मनात असे आले आहे की सर फेरोजशहा मेथा याना एकवार लिहावे आणि टिळक मी व बॅपटिस्टा यांची गाठ घेतात का विचारावे. त्याना भेटल्यावर मग जिल्हा सभेची घटना निश्चया- त्मक करू. मद्रास येथे समेटकमिटी नेमली त्यावर इतर प्रांतातील लोकांच्या नेमणुकी अद्यापि झाल्या की नाही ? असल्यास कोण कोण निवडले ? आमच्या उसवाची एकेक प्रत त्या सर्वाना पाठवावी असे वाटते. इकडे पहावे तो लोकाना आम्ही आणि कन्व्हेन्शनवाले यांच्यात काय फरक आहे हेच अजून त्याना नीटसे उमगत नाही. आणि अशा गैरसमजुतीने ते जिल्हा काँ. कमिट्या बनवीत अस- तात. तरी भेदातील मर्म खरे काय आहे हे लोकांच्या लक्षात येण्यासाठी तुम्ही केसरीत एक लेख लिहावा असे वाटते. कारण कित्येक लोकाना या कमिट्या या लोकाना आपले समासद करून घेण्याचे नाकारतात.