पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ७ गीतारहस्याचे ताप असे आढळून येईल की पातंजलयोगाचे किंवा ज्ञानविज्ञानाचे हे निरूपण स्वतंत्र नाही. निष्काम कर्मयोगाची मातब्बरी कर्मसंन्यासापेक्षा अधिक असे सांगितल्या- नंतर निष्काम कर्मयोगाचे सिद्धयर्थं अवश्य लागणारी निष्कामबुद्धि संपादन करण्यास साधने कोणती आणि संन्यासमार्गाप्रमाणे निष्काम मार्गानेही मोक्ष कसा मिळतो, हे सप्रमाण सिद्ध करून दाखविणे जरूर होते. पैकी निष्कामबुद्धि संपादन करण्याचे साधन म्हणून अर्जुनाच्या प्रश्नावरून पातंजलयोगातील आसनाचे व चित्तनिरोधाचे सहाव्या अध्यायात निरूपण आले आहे. पण चित्तनिग्रहाचे हे काम एकाच जन्मात सिद्ध न झाल्यास मनुष्य बुडालाच समजावयाचा की काय, अशी अर्जु- नास शंका आल्यामुळे निष्काम कर्मयोगात काही फुकट जात नाही, यथाशक्ति प्रयत्न करीत गेले म्हणजे पूर्वजन्मीचे संस्कार पुढे कायम राहून आज नाही तर उद्या, या जन्मी नाही तर पुढील जन्मी तरी, कर्मयोगाने अखेर खास सिद्धि प्राप्त होते, असे भगवंतानी आश्वासन दिले आहे. परंतु बुद्धि निष्काम होण्यास पातं- जल योगापेक्षाहि अध्यात्मचिंतन आणि अध्यात्मचिंतनापेक्षाहि भक्ति ही मह- त्वाची व सुलभ साधने होत व यांचा विचार ७ पासून १७ अध्यायापर्यंत केला आहे. अध्यात्मविचार करण्याची पद्धत अशी आहे की, प्रथम बाह्य सृष्टीचा विचार करून त्याच्या बुडाशी काय तत्व आहे हे ठरवावयाचे यास क्षराक्षर - विचार असे म्हणतात. हा विचार कापिल - सांख्यशास्त्रात केलेला आहे. म्हणून तदनुरो- घाने गीतेतील ७-८-९ व पुढे चौदापासून सतरा अध्यायातील वर्णने केलेली आहेत. क्षराक्षरांचा याप्रमाणे विचार केल्यावर मनुष्याच्या देहात चालक शक्ति कोण याचा विचार करावा लागतो व तो तेराव्या अध्यायात केला आहे. यास क्षेत्रक्षेत्रज्ञ विचार असे म्हणतात. क्षराक्षर व क्षेत्रक्षेत्रज्ञ यांचा याप्रमाणे विचार झाल्यावर दोहोकडे अखेर जी तत्त्वे निष्पन्न होतात ती दोन नसून एकच आहेत. जे पिंडी ते ब्रह्मांडी असे सिद्ध करावे लागते. व हेच सर्व वेदांताचे रहस्य होय. यासच परब्रह्म किंवा भक्तिशास्त्रातील परिभाषेत पुरुषोत्तम असे म्हणतात. या पर- मत्वाचे अनुभवात्मक ज्ञान होऊन बुद्धि आत्मनिष्ठ किंवा ब्रह्मनिष्ठ म्हणजे सर्वो- भूती सम व शांत होणे हाच खरा मोक्ष होय. मोक्ष ही एक विशिष्ट प्रकारची आध्यात्मिक मनोवस्था आहे; इह लोकाच्या पलीकडे ठेवलेला गड्डा नव्हे- मोक्षस्य न हि वासोस्ति न ग्रामांतरमेव वा । अज्ञानहृदयग्रंथिनाशी मोक्ष इतिस्मृतः ॥ - असे शिवगीतेत म्हटले असून भगवद्गीतेचा व उपनिषदांचा सिद्धांत तसाच आहे. ही आध्यात्मिक स्थिति ज्या पुरुषास प्राप्त झाली त्यास जीवन्मुक्त असे म्हणतात व अशा प्रकारची जीवन्मुक्तावस्था संपादन करून त्यात सिद्ध झालेल्या निष्काम बुद्धीने लोकसंप्रदार्थ आमरणांत निष्काम कर्मे करीत राहणे हेच गीतेतील सर्व उपदेशाचे सार होय. अशा ज्ञानी पुरुषास त्याने केलेल्या निष्काम कर्माचे पापपुण्य लागत नाही इतकेच नव्हे, तर त्याची कर्म करण्याची जी रीत तीच इतरास कित्त्यासारखी होऊन त्यामुळे लोकांची स्थिति उत्तरोत्तर सुधारत जात असते.