पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३० लो० टिळकांचे चरित्र भाग ७ नसती, तर गीतेवर अनेक टीका होणेहि शक्य झाले नसते. गीतेमध्ये निष्काम कर्मयोगच प्रतिपाद्य आहे, याबद्दल दुसरा पुरावा म्हणजे चौथ्या अध्यायात दिलेली गीताधर्माची परंपरा होय. भगवान - विवस्वान - मनु- इक्ष्वाकु अशी ही परंपरा सांगितली आहे. पातंजलयोगात ही परंपरा कोठेच दिलेली नाही महाभारतात शांतिपर्वाच्या अखेर नारायणीयोपाख्यानात नारायणीय किंवा भाग- वतधर्माची सात कल्पातील जी एक मोठी परंपरा दिली आहे, त्यातील हल्लीच्या महायुगातील त्रेतायुगाच्या परंपरेशी मात्र गीतेची परंपरा जुळते व त्यावरून नारायणीय किंवा भागवतधर्मं 'योग' या नावाने गीतेत प्रतिपाद्य आहे, असे सिद्ध होते. हा नारायणीय धर्म प्रवृत्तिपर असून शिवाय मोक्षप्रदहि आहे, असे याच म्हणजे नारायणीयोपाख्यानात पुढे वर्णन आहे. गीतेवरील टीकाकारानी गीता-धर्माच्या या परंपरसंबंधाने विचार केला असल्याचे मला आढळून आले नाही. गीतेचे पांचव्यापुढले अध्याय असली, तरी नसून हे तीन गीतेतील उपदेशास सांख्य व योग या दोन मार्गापासून सुरुवात झाली असून या दोहोंपैकी निष्काम कर्मयोगच श्रेष्ठ, असा निकाल झाल्यावर पुढे दुसरे काही प्रश्न साहजिक रीत्याच उपस्थित होतात; व त्यांचे उत्तर पांचपासून सत- राव्या अध्यायापर्यंत दिलेले असून गीतेतील शेवटल्या म्हणजे अठराव्या अध्यायात एकंदर सर्व विषयांचा उपसंहार केला आहे. गीतेतील अठरा अध्यायांची अशा प्रकारे वांटणी न करता कर्म, भक्ति व ज्ञान या तिहींना किंवा तत्, त्वं, अस या " तत्वमसि " वाक्यातील तीन पदाना यथानुक्रम सहा सहा अध्याय वांटून देण्याची काही टीकाकारांची रीत आहे. पण माझ्या मते ही रीत बरोबर नाही. कर्म, भक्ति व ज्ञान ही स्थूल मानाने तीनहि गीतेत प्रतिपाद्य एकेकाच्या वांटणीस बरोबर सहा सहा अध्यायच येतात असे विभाग स्वतंत्र म्हणजे परस्परनिरपेक्ष आहेत, असेहि मानता येत तत् आणि असि या तीन पदांचे निरूपण करणारे सहा सहा अध्याय आहेत असे म्हणणे याहून विचित्र आणि निराधार आहे. गीतेतील नऊ, दहा, अकरा व बारा हे चार अध्याय भक्तिपर आहेत असे म्हणता येईल. पण जरा सूक्ष्म विचार केला तर असे दिसून येईल की, या अध्यायातूनही ज्ञानाचा व विशेषतः कर्माचा धागा कायम ठेवला असून भक्तितत्त्वाचा उल्लेख मागे म्हणजे चौथ्या अध्यायातच 'श्रद्धावान् लभते ज्ञानम् ” या श्लोकात झालेला आहे. सारांश, वर सांगितलेली त्रिविध वांटणी सयुक्तिक नसून सहाव्या अध्यायात पातंजल योग आणि पुढील अकरा अध्यायात सामान्यतः भक्तियुक्त ज्ञानविज्ञान वर्णिले आहे, असे म्हणावे लागते. हे ज्ञानविज्ञान का वर्णिले ? स्वतंत्र म्हणून किंवा दुसऱ्या काही कारणासाठी ? याचा आता विचार केला पाहिजे. हा विचार करू लागले असता CC नाही. पण त्वं