पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ७ गीतारहस्याचे तात्पर्य २९ र्मणः – ” अकर्मापेक्षा कर्म श्रेष्ठ हा सिद्धांत होय. ' तस्मात् ' ज्ञानी पुरुषानेहि निष्कामबुद्धीने कर्म केले पाहिजे असा गीतेत सिद्धांत असून त्याचप्रमाणे लाग- ' लीच अर्जुनास उपदेशहि केला आहे. गीतेतच नव्हे तर योगवासिष्ठातहि हा अर्थ स्पष्ट केला आहे. अर्जुन अज्ञानी म्हणून त्यास निष्काम कर्म करण्यास सांगितले ही कोटी ग्राह्य धरिता येत नाही. असो. कर्म करण्यास शेवटचे म्हणून जे कारण सांगितले आहे ते लोकसंग्रह होय. लोकसंग्रह म्हणजे अडाणी लोकास न दुख- "विण्यासाठी त्यांच्याप्रमाणे वागण्याचे सोंग करणे असा अर्थ नाही. व्यावहारिक कर्मे कशी करावयाची याचा लोकास प्रत्यक्ष आपल्या निष्काम वर्तनाने धडा घालून देऊन केवळ पृथ्वीवरील लोकांचीच नव्हे तर देवादि लोकांचीहि (अ. ३ श्लोक ११ ) सुस्थिति उत्तरोत्तर वृद्धिंगत व कायम करणे हा लोकसंग्रहाचा खरा अर्थ होय. साधूंचे संरक्षण व दुष्टांचा निग्रह - 'परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ' - हा त्यांतलाच एक भाग आहे; व तो करण्यासाठी खुद्द भगवानहि जर वेळोवेळी अवतार घेतात तर ज्ञानी पुरुषानेहि तेच काम करून लोकसंग्रह केला पाहिजे, असा गीतेतील उपदेशाचा इत्यर्थ आहे. सारांश 'कर्म मोक्षाला कारण होत नाही ज्ञान हेच मोक्षाचे कारण आहे ज्ञानाचा उजेड पडल्यावर कर्माचा अंधकार त्या ठिकाणी राहू शकत नाही' इत्यादि जो संन्यासपक्षीयांचा कोटिक्रम आहे तो भगवद्गीतेत स्वीकारलेला नाही. मोक्ष ज्ञानानेच मिळतो हे तत्त्व भगवद्गीतेस मान्य आहे. पण मनुष्य कितीहि मोठा ज्ञानी किंवा भगवद्भक्त झाला तरी निष्काम कर्म त्याला सुटत नाही; मोक्षाकरिता नको असले तरी लोक- संग्रहार्थ त्याने ते अवश्य केले पाहिजे असे भगवद्गीतेचे विशेष सांगणे आहे. किंब हुना मनुष्य ज्ञानी झाला म्हणजे अज्ञानी जनास निष्काम कर्म करण्याची प्रत्यक्ष उदाहरणाने संवय लावून देण्याची एक नवीन जबाबदारी त्याचेवर पडते असे ' यद्यदाचरति श्रेष्ठः ' या श्लोकाचे तात्पर्य आहे म्हटले तरी चालेल. निरनिराळे आचार्य आपापल्या भाष्यातून असा अर्थ करीत नाहीत हे मला माहीत आहे व हे आचार्य मोठे विद्वान् धार्मिक व सत्त्वशील होते हेहि मला मान्य आहे. विशे- षतः श्रीशंकराचार्यासारखा तत्त्वज्ञानी पुरुष आजपर्यंत या जगात झाला नाही असे मी समजतो व शांकरभाष्यात प्रतिपादन केल्याप्रमाणे गीतेतील वेदांतहि अद्वैत- परच आहे असे माझे मत आहे. पण निरनिराळ्या आचार्यांचे मत काय आहे हे आपणास सध्या पाहावयाचे नसून सांप्रदायिक दृष्टि सोडली तर गीतेचे अखेर ध्येय काय ठरते एवढाच आपल्यापुढचा प्रस्तुत प्रश्न होय. म्हणून या बाबतीत अनेक आचार्यांशी माझा मतभेद असल्यास त्यावरून या आचार्यास मी कमी पूज्य समजतो असे कोणीहि समजू नये. याला उत्तम उदाहरण म्हटले म्हणजे आचार्याच्या मागून त्यांच्या सांप्रदायिक अनुयायानीहि आपापल्या टीकात प्रसंगा- 'नुसार निरनिराळे अर्थ केले आहेत हे होय. किंबहुना गीतेचे असे अर्थ करण्यास सवड टि० उ...३९ म. म. द. वा. पोतदा भंग संग्रह