पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८ लो० टिळकांचे चरित्र भाग ७ किंवा युद्ध करू ? ज्ञानी पुरुषास यापैकी उचित काय ? हा अर्जुनाचा प्रश्न होता. म्हणून ज्ञानी पुरुषाच्या आचरणाचे या जगात आढळून येणारे जे दोन मार्ग किंवा 'निष्ठा' - सांख्य व कर्मयोग - या दोहोपासूनच गीतेस सुरुवात झाली आहे व या दोन मार्गांपैकी ग्राह्य कोणता हे ठरविणे हाच गीतेतील मुख्य विषय आहे. योग म्हणजे पातंजल योग नव्हे. सहाव्या अध्यायातील काही लोक खेरीजकरून योग म्हणजे कर्मयोग हाच अर्थ गीतेत विवक्षित आहे हे 'समत्वं योग उच्यते ' आणि 'योगः कर्मसु कौशलम्' या गीतेतील व्याख्येवरूनच उघड होते. किंच- हुना 'योग' या शब्दाचा कर्मयोगाखेरीज दुसरा भलतासलता अर्थ कोणी करू नये एतदर्थच या व्याख्या दिलेल्या आहेत असे म्हटले तरी चालेल. पुरुष ज्ञानी झाला म्हणजे तो ( १ ) शुकाचार्याप्रमाणे कर्मे सोडील किंवा (२) जनक- श्रीकृष्णाप्रमाणे सर्व व्यावहारिक कर्मे निष्कामबुद्धीने करील असे दोन पक्ष संभव- तात व यासच अनुक्रमे सांख्य व योग या संज्ञा आहेत. पण हे दोनद्दि पक्ष अर्जु- नाला सांगून काय उपयोग ? ' तदेकं वद निश्चित्य' - यापैकी काही तरी एक मला निश्वयेकरून सांगा असे भगवंताजवळ वाचे मागणे होते. म्हणून त्यास उत्तर देताना पांचव्या अध्यायात 'कर्मसंन्यास आणि कर्मयोग हे दोनहि जरी एकसारखेच निःश्रेयस्कर म्हणजे मोक्षप्रद आहेत तरी 'तयोतु कर्मसंन्यासात्कर्म- योगो विशिष्यते ' - या दोहोत कर्मसंन्यासापेक्षा कर्मयोगाची मातब्बरी अधिक- असे भगवंतानी स्वच्छ सांगितले आहे. आणि ही योग्यता अधिक का ? याची कारणे तिसन्या व चौथ्या अध्यायात आहेत. या अध्यायामध्ये भगवान् असे सांगतात की कोणी मनुष्य कितीहि ज्ञानी झाला तरी निजणे बसणे उठणे इ. कर्म त्याला कधीच सुटत नाही. सृष्टि उत्पन्न झाली तेव्हा यज्ञचक्र उत्पन्न झाले आणि यज्ञ जर कर्माखेरीज होत नाही तर कर्म सोडणे म्हणजे पज्ञचत्र बुडवून ब्रह्मदेवाची गुन्हेगारी करणे होय ! आता कोणी असे म्हणेल की ज्ञानी झाला म्हणजे त्याला मोक्ष मिळाला मग त्याचे काही कर्तव्य उरत नाही (कार्य न विद्यते) किंवा त्याने काही केले काय न केले काय सारखेच असते (अ. ३ श्लोक १७-१८). कित्येकांच्या मते हाच गीतेचा सिद्धांत पक्ष होय. पण हा अर्थ प्रकरणास जुळत नाही. प्रकरण कर्मयोगाचे आहे आणि ज्ञानी पुरुषानेहि कर्म केले पाहिजे हा अर्थ (अ. ३-२५) या ठिकाणी प्रतिपाद्य असून तत्सिद्धयर्थ जनकादिकाचा व पुढे खुद्द भगवंतानी आपलाहि दाखला दिला आहे. म्हणून ज्ञानी पुरुषाने काही करू नये असे मध्येच विधान करणे शक्य नाही. यासाठी 'ज्ञानी पुरुषाचे काही कर्तव्य शिलक राहिले नसते. त्याने एखादी गोष्ट केली काय न केली काय सारखेच ' हा पूर्वपक्षाचा किंवा हेतूंचा अनुवाद घेतला पाहिजे. आणि त्याचे उत्तर काय हे पुढील श्लोकात ' तस्मात् ' हे कारण - बोधक पद घालून सांगितले आहे. ज्ञानी पुरुषाला कर्म करणे न करणे जर सार- खेच तर न करण्याचा तरी आग्रह का ? केव्हाहि झाले तरी " कर्म उपायो क