पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ७ 64 गीतारहस्याचे तात्पर्य २७ नव्हे तर पितामह भीष्म व गुरु द्रोण यांचा वध करावा लागणार. आणि न करावे तर क्षात्र धर्मं सुटल्यामुळे तिकडूनहि नरकवास प्राप्त होणार. एकीकडे आड तर दुसरीकडे विहीर अथी स्थिति झाल्यावर तो श्रीकृष्णास शरण गेला आणि श्रीकृष्णानी गीता सांगून त्याला ताळ्यावर आणला व युद्ध करण्यास लावले. हा गीतेचा उपसंहार आहे. हा उपसंहार केवळ वाचनिक किंवा ग्रंथात लेखी आहे इतकेच नव्हे तर पुढे तसा साक्षात् परिणामहि घडलेला आहे. तसेच संबंध ग्रंथात जागोजाग अनेक कारणे सांगून 'तस्माद्युद्धयस्व भारत' 'हे अर्जुना म्हणून तू युद्ध कर – असा उपदेश केलेला आहे. यातील ' म्हणून 2 " हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचा असा अर्थ होतो की निरनिराळी कारणे दाखवून अनेक बाजूंनी या वेळी युद्ध करणे हेच तुझे कर्तव्य होय " या सिद्धांताबद्दल अर्जु- नाची न्यायदृष्ट्या खात्री करून दिली आहे. अर्जुनाने संन्यास घ्यावा किंवा सर्व- काल भक्तीत गढून राहून दुसरे काही कर्म करू नये, असे श्रीकृष्णाच्या मनातून त्यास सांगावयाचे नव्हते. तसे असते तर गीता सांगण्याचीच जरूरी नव्हती. कारण अर्जुन संन्यास घेण्यास तयारच झाला होता तेव्हा. "तू म्हणतोस तसेच माझे मत आहे आपण दोघेही संन्यास घेऊन आपल्या आत्म्याचे कल्याण करू' असे उत्तर त्यास दिल्याने काम भागत होते. पण तसे काही एक न करतां ' हा हिजडेपणा ( क्लैब्य) तुला शोभत नाही' अशी दुसऱ्या अध्यायाच्या आरंभी श्रीकृष्णानी त्याची निर्भत्सना केली आहे व ' नियतं कुरु कर्म त्वम् ' असे त्यास सांगितले आहे. यावरून गीतेचे जर काही तात्पर्य असेल तर ते अखेर प्रवृत्तिपर म्हणजे कर्मपरच असले पाहिजे हे उघड होते. भक्तीत किंवा ज्ञानात गढून जाऊन सर्व कर्माचा स्वरूपतः संन्यास करणे हैं मत गीतेत प्रतिपाद्य असणे शक्य नाही. गीतेचे पहिले पांच अध्याय " गतिच्या उपक्रमोपसंहारावरून गीतेच्या तात्पर्याचा जो निर्णय केला त्याचें उपपादन गीतेच्या अठरा अध्यायात कसे केले आहे हे आता आपण पाहू. पैकी पहिले पांच अध्याय प्रथम घ्या. यातील पहिल्या अध्यायाचे तात्पर्य वर सांगि- तलेच आहे. दुसऱ्या अध्यायातील " अशोच्यानन्वशोचस्त्वम् " येथपासून भग- वंताच्या उपदेशास सुरुवात झाली आहे व यातील पहिले काही लोक वेदांतपर असल्यामुळे गीतेत हाच वेदांत प्रतिपाद्य आहे असे कित्येक समजतात ! पण खरा प्रकार तसा नाही असे थोड्या सूक्ष्म विचारांती दिसून येईल. 'अशोच्यानन्वशो- चस्त्वम्' येथपासून 'एषा तेऽभिहिता सांख्ये बुद्धियोंगे त्विमां शृणु' येथपर्यंत सांख्यमार्गांचे ज्ञान सांगून पुढे याच अध्यायात योगाचे म्हणजे कर्मयोग मार्गाचे ज्ञान सांगण्यास सुरुवात केली आहे. म्हणजे गीतेतील उपदेशास सांख्य व कर्मयोग या दोन मार्गापासून सुरुवात आहे नुसत्या वेदांतापासून नाही असे निष्पन्न होते. युद्ध सोडून देऊन सांख्य मार्गातील संन्याश्याप्रमाणे भिक्षा मागत रानात राहूं