पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६ लो० टिळकांचे चरित्र भाग ७ परीक्षण. अंतरंगपरीक्षणात ग्रंथाचे तात्पर्य ठरविण्यात येते. आणि बहिरंगपरी- क्षणात ग्रंथ कोणी कोठे व केव्हा केला त्या ग्रंथात दुसन्या ग्रंथांचा कोणता उल्लेख आला आहे इत्यादि बाह्यांगाचाच विचार करीत असतात. माझ्या गीता- रहस्यात या दोनहि प्रकारे गीतेचा विचार केलेला आहे. पण या लेखात फक्त अंतरंगपरीक्षणाबद्दलच माहिती दिली आहे. कारण बहिरंगपरीक्षण ऐतिहासिक दृष्ट्या जरी महत्त्वाचे असले तरी ऐतिहासिकच नव्हे तर धार्मिक नैतिक वगैरे अनेक दृष्टीनी अंतरंगपरीक्षण म्हणजे ग्रंथ - तात्पर्व निर्णयच सर्व लोक अधिक महत्त्वाचा समजतात व सध्याच्या काली तर तो विशेष महत्त्वाचा आहे. कारण वरील द्वैती अद्वैती वगैरे पंथाखेरीज काही मिशनरी लोक गीता अत्याचारास प्रवृत्त करणारी आहे अशीदि दीर्घ शंका आता काढू लागले आहेत. ही शंका खोटी व सर्वस्वी निर्मूल होय असे पुढील विवेचनावरून दिसून येईल. गीतेतच काय पण सामान्य हिंदु धर्मासहि अत्याचाराचे प्रकार केव्हाच मान्य झालेले नाहीत व ते मान्य असणे शक्यहि नाही. असो. गीता महाभारताचे एक आव- tयक अंग आहे किंवा त्यात घुसडून दिलेली आहे ? अथवा मूळ गीता लहानं असून त्यात प्रसंगाप्रमाणे मागाहून अनेकानी अनेक क्षेपक श्लोक घातलेले आहेत ? आणि असल्यास ते कोणते ? इत्यादि प्रश्न या बहिरंगपरीक्षणाच्या वर्गातच पडतात. पण त्याचा सविस्तर विचार या लेखात करणे शक्य नाही. पण माझ्या मते या सर्व शंका निर्मूल होत. आणि हल्लीचा गीता-ग्रंथ पौराणिक पद्धतीने व संवादरूपाने लिहिला असला तरी तो सुसंगत असून त्यातील सर्व विषय शास्त्रीय प्रतिपादनास अवश्यक आहेत एवढा माझा सिद्धांत येथे सांगून अंतरंगपरी- क्षणाच्या मुख्य विषयाकडे वळतो. अंतरंगपरीक्षणाची रीति एखाद्या ग्रंथाच्या तात्पर्याचा निर्णय कसा करावा याबद्दल आधुनिक ग्रंथ- परीक्षाशास्त्रज्ञानी जे नियम घालून दिले आहेत ते काही नवीन नाहीत. आमच्या मीमांसकानी हजारो वर्षापूर्वी असे ठरविले आहे की ' कोणत्याहि ग्रंथाचे तात्पर्य ठरविण्यास ( १ ) त्या ग्रंथाचा आरंभ व शेवट कसा आहे ( २ ) त्यात वारंवार काय सांगितले आहे ( ३ ) त्यात अपूर्वता कोणती ( ४ ) त्याचा परिणाम किंवा फल काय घडले ( ५ ) त्यात उपपत्ति कोणती सांगितली आहे आणि (६) या उपपत्तीच्या दृढीकरणार्थ किंवा अन्य कारणासाठी दुसऱ्या कोणत्या कोणत्या प्रासंगिक गोष्टी त्यात आहेत ? या सहा गोष्टींचा विचार करून ग्रंथाच्या तात्पर्याचा निर्णय केला पाहिजे. ग्रंथतात्पर्यनिर्णयाची मीमांसकांची ही कसोटी गीतेम लावून गीतेचा आरंभ व शेवट काय हैं पाहू लागले म्हणजे असे दिसून येते की भारती युद्धाच्या आरंभी समोर आलेल्या बांधवास पाहून अर्जुनास आपल्या कर्तव्याचा मोह पडला अशी गीतेची सुरुवात आहे. युद्ध करावे तर कुलक्षय होणार इतकेच