पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ७ गीतारहस्याचे तात्पर्य २५ की गीतेवर जी भाष्ये व टीका संध्या उपलब्ध आहेत त्या निरनिराळे सांप्रदायिक - आचार्य व त्यांचे अनुयायी यांच्या आहेत. व त्यामुळे ज्याने त्याने गीतार्थ आपल्या सांप्रदायास अनुकूल होईल अशा रीतीनेच निरूपिला आहे. उदाहरणार्थ श्रीमत् आद्य शंकराचार्य यांच्या भाष्यात गीतेचा अर्थ अद्वैतपर व संन्यास प्रति- पादक लावला असून रामानुजाचार्यांच्या मते तीच गीता विशिष्टाद्वैतपर व भक्ति- प्रतिपादक आहे आणि मध्वाचार्यांच्या मते गीतेत भक्ति प्रधान असली तरी ती द्वैत- मूलक आहे. किंबहुना शंकराचार्यांनी आपल्या भाष्याच्या आरंभीच असे म्हटले आहे की " गीतेवर अनेकानी पूर्वी टीका केल्या पण त्यास गीतेचा अर्थ नीट कळला नसून सर्वकर्मसंन्यासपूर्वक ज्ञानानेच मोक्ष मिळतो हेच काय ते खरे गीतेचे तात्पर्य होय हे सिद्ध करण्यासाठी हे भाष्य लिहिले आहे. वल्लभ व निवार्क यांच्या सांप्रदायांच्या गीतेवर ज्या टीका आहेत त्यात अशीच विधाने केली आहेत. कोणी कर्मसंन्यासपूर्वक अद्वैत तर कोणी विशिष्टाद्वैतयुक्त भक्ति, कोणी द्वैती भक्ति तर कोणी ज्ञानपूर्वक पातंजल योग, कोणी सगुणभक्ति तर कोणी ज्ञान व भक्ति, यांचा मिलाफ गीतेत प्रतिपाद्य आहे असे म्हणतात. केवळ माझेच असे मत आहे असे नाही तर प्रसिद्ध मराठी कवि वामन पंडित यांची गीतेवर यथार्थदीपिका नामक जी टीका आहे तिच्या आरंभी " या कलियुगामाजि । जो तो गीतार्थ योजी । मतानुसार ॥" असे म्हटले आहे. यावरून गीतेवरील सर्व टीका प्रायः त्या त्या टीकाकारांचा जो सांप्रदाय त्याला अनुसरून आहेत. सांप्रदायनिरपेक्ष म्हणजे कोणत्याहि सांप्रदायाचा आग्रह न ठेविता केवळ सर्व गीता वाचून तिचा सरळ अर्थ काय लागतो हें सांगण्याचा या टीकाकारांचा हेतु नाही असे दिसून येईल. सांप्रदायिक दृष्टया गीतेची ही जी निरनिराळी तात्पर्ये ठरविलेली आहेत ती त्या त्या सांप्रदायातील लोकास मान्य असल्यास त्यात काही नवल नाही. प्रस्थानत्रयीतील सर्व ग्रंथ आप- ल्याच सांप्रदायास अनुकूल आहेत असे दाखविल्याखेरीज लोकात कोणताहि सांप्र- दाय मान्य होत नाही त्यामुळे असे अर्थ लावणे भाग पडते. पण हे सर्वच अर्थ यथार्थ असणे ज्या अर्थी शक्य नाही त्या अर्थी त्या सर्वांची छाननी करून गीतेचे कोणते तात्पर्य यथार्थ आहे हे पाहणे जरूर पडते. ही शंका माझ्या मनात येऊन आज बरीच वर्षे झालेली आहेत. व या कालात मनात घोळत असलेले विचार व्यवस्थित रीतीने एकत्र करून माझ्या गीतारहस्य नामक ग्रंथात नमूद केलेले आहेत. माझे सिद्धांत एकदमच सर्वास ग्राह्य होतील असे मी म्हणत नाही. पण गीतार्थी संबंधाने विचार करण्यास आधुनिक चिकित्सकदृष्ट्या त्यांचा बराच उपयोग होईल अशी मला आशा आहे. ग्रंथपरीक्षणाचे प्रकार सांप्रदायिक दृष्टि सोडली तर ग्रंथाचे परीक्षण कसे करावे हा यापुढला प्रश्न होय. अंथपरीक्षण दोन प्रकारचे असते. एक अंतरंगपरीक्षण व दुसरे बहिरंग