पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४ लो० टिळकांचे चरित्र भाग ७ आली तशीच ती गीतेच्या अध्ययनातहि दिसून आली. आपल्या नवीन कल्पनेचा पहिला उच्चार टिळकानी १९०२ साली नागपुरास एका व्याख्यानात केला. पण त्यांच्याशी यापूर्वी परिचय असणाऱ्या पुष्कळ लोकाना त्यांची ही कल्पना तुटक उद्वारातून बाहेर पडलेली ऐकावयाला मिळाली होती. आता याच विषयावर अशी व्याख्याने टिळकानी दिलेली नमूद नाहीत. ही मात्र किंचित् आश्चर्याची गोष्ट आहे. कारण अनेक प्रकारच्या उत्सवात अनेक प्रकारच्या धार्मिक चर्चेचे विषय निघणे स्वाभाविक. व अशा विषयावर व्याख्याने देण्याचे प्रसंग पुष्कळच. तसेच एखादे मत आपले म्हणून ते लोकांच्या गळी उतरेपर्यंत त्याची टाकी सुरू ठेव- ण्याची टिळकाना सवय. या सर्व गोष्टी लक्षात घेता या विषयावरील त्यांची व्याख्याने आहेत त्याहून अधिक उपलब्ध असावयास पाहिजे होती. पण तसे घडले नाही खरे. आणि या विषयावर त्यानी पुस्तक लिहावे म्हटले तरी त्याला वेळ मिळणे सर्वच बाजूनी कठीण अशा रीतीने प्रवृत्तिमार्गाचा उपदेश कर- णारा हा ग्रंथ प्रवृत्ति प्रवाह - पतित कर्मात रात्रंदिवस घातलेल्या टिळकाना निवृत्तकार्य अशी तुरुंगातील सवड अनिच्छेने लाभली तेव्हाच लिहिता आला हा योग विलक्षण नव्हे काय ? (७) गीतारहस्याचे तात्पर्य गीतारहस्य हा ग्रंथ सुलभ असला तरी त्याचे गोष्ट काही तितकी सुलभ नाही. पण सुदैवाने स्वतः बिनचूक तात्पर्य काढणे ही टिळकानीच हा ग्रंथ प्रसिद्ध करण्यापूर्वी त्याचे तात्पर्य पुण्यास १९१४ च्या सप्टेंबर महिन्यात स्वतःच्या वाड्यात गणपत्युत्सवात व्याख्यानरूपाने सांगितले, इतकेच नव्हे तर नंतर ते स्वतः सांगून लिहवून घेऊन व तपासून केसरीत प्रसिद्ध केले. अर्थात् या तात्पर्याहून अधिक अधिकृत असे तात्पर्य दुसरे कोणते असणार ? म्हणून तेच आम्ही या खाली उतरून देतो. टिळक म्हणतात:-- गीतारहस्यासंबंधी मी जे प्रवचन केले ते ' गीतारहस्य' नामक मी लिहि- लेल्या नव्या ग्रंथाचा सारांश होय. या ग्रंथात प्रथम पंधरा सोळा प्रकरणात गीता- रहस्याचा शास्त्रीय रीत्या सांगोपांग विचार केल्यावर मग या प्रकरणात गीतेचे जे तात्पर्य निश्चित केले त्यास अनुसरून गीतेचे मराठी भाषांतर जोडलेले आहे. एवढ्या समग्र ग्रंथाचा पुरा सारांशहि तीन चार प्रवचनात सांगणे शक्य नव्हते. तथापि एकंदर ग्रंथाचे मुख्य धोरण काय असा मला पुष्कळानी प्रश्न केला अस- ल्यामुळे तोच विषय प्रवचनासाठी मी घेतलेला होता. या प्रवचनानी माझ्या ग्रंथातील मुख्य मुद्दा कळला तरी त्यावरील शंका व त्यांची समाधाने कळण्यास मूळ ग्रंथच पहावा लागेल हे सांगावयास नको. गीतेवर अनेक भाषेत टीका व निरूपणे झाली असता तुम्ही गीतेसंबंधाने नवे असे काय सांगणार ? असा पहि- ल्यानेच प्रश्न निघणे अगदी साहजिक आहे. या प्रश्नास माझे असे उत्तर आहे