पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२ लो० टिळकांचे चरित्र भाग ७ विद्वत्ता पुरते. लोकोत्तर विद्वत्ता लागत नाही. किंवा कोणत्याहि एका विषयाचे गूढ सांगोपांग असे ज्ञान लागत नाही. सामान्य वाचकांचेच विचार पण त्यांच्यापेक्षा थोडे अधिक कल्पकतेने थोड्या अधिक माहितीने व थोड्या अधिक निश्चितार्थाने कोणास लिहिता आले म्हणजे संपादक हा वाचकापेक्षा अधिक शहाणा ठरतो ! पण टिळकांच्या विद्वत्तेविषयी याच्याहि पलीकडे जाऊन काही एक प्रकारची लोकांची कल्पना होती व ती यथार्थ होती. ज्यानी त्यांची वर्तमानपत्रे हाती धरली नाहीत त्यानी त्यांचे ग्रंथ निर्विकार बुद्धीने हाती घेऊन वाचले व त्यांच्या बुद्धिमत्तेविषयी प्रांजल कबूली दिली. युरोपियन पंडितानी तर टिळकाना वेदविद्येतील पंडितात गणले ते त्यांच्या केसरी मराठ्यातील लेखावरून नव्हे. तेव्हा अशा रीतीने देशात व परदेशात कीर्ति पावलेली टिळकांची ही विद्वत्ता होती तरी कसली हे पाहण्याला मराठी वाचकवर्ग सदैव उत्सुक असला पाहिजे. व त्याचे समाधान या ग्रंथाने स्वचित केले. पण ग्रंथ मराठीत लिहिल्यामुळे स्वकीयातलेच प्रतिपक्षी टिळकाना या ग्रंथापुरते तरी अधिक भेटले. ओरायन ग्रंथातील सिद्धांत अमान्य करणाऱ्या हिंदु पंडिताचे नाव आम्ही आजवर ऐकलेले नाही. आर्याच्या वसतिस्थानासंबंधाने एक नाना- साहेब पावगी यांखेरीज दुसऱ्या कोणी विद्वानाने अमान्यता दाखविलेली आमच्या आढळात नाही. पण गीता रहस्यातील टिळकांचे सिद्धांत अमान्य म्हणणारे पुष्कळ लोक आढळले. व त्या इतर दोन ग्रंथाप्रमाणे या ग्रंथाचे यश निःसंदेह मानले जात नाही. मराठी भाषेत ग्रंथ लिहिल्याचा एक फायदा तर एक तोटा झाला. पण आमच्या दृष्टीने फायद्यापेक्षा तोटा फारच थोडा. कोणाहि ग्रंथकाराला चार सिद्धांतिक प्रतिपक्षी भेटणे यात विशेष हानी नाही. पण 'गीतारहस्या'- सारख्या महत्त्वाच्या ग्रंथातील आपल्या मनाने मानलेले रहस्य हजारो स्वकीयांच्या मनात बिंबवून देण्याची संधि लाभणे हा फारच मोठा फायदा होय. आणि हा ग्रंथ मराठी भाषेत लिहिल्यामुळे टिळकाना तो फायदा लाभला खरा. हा ग्रंथ मराठी भाषेत लिहिला असल्यामुळे हे प्रकरण लिहिण्याचे आमचे कामहि पुष्कळच सुलभ झाले आहे. ते असे की त्यात स्पष्ट लिहिलेल्या कोणत्याहि गोष्टीसंबंधाने आम्हाला वाचकाना या ग्रंथात माहिती देण्याचे कारण नाही. एरवी लिहिताना केसरी पत्रातील टिळकांच्या लेखातील कित्येक उतारे आम्ही मधून मधून दिले आहेत. तसेच त्यांच्या व्याख्यानांची जी पुस्तके उपलब्ध आहेत त्यांतूनहि काही उतारे आम्ही प्रसंग विशेषी दिले आहेत. पण त्याचे कारण हेच की ते ते केसरीचे अंक त्या त्या वेळी लोकानी बाचले असले तरी केसरीची जुनी 'फाइले ' कोणाला सुलभ नसतात. तीच गोष्ट जप्त झालेल्या व्याख्यानांच्या पुस्तकासंबंधाने. केसरीचा कोणचाहि अंक जप्त किवा सरकारजमा झालेला नसला तरी केसरीची फाइले एका निराळ्या कारणाने कोणी फारशी ठेवीत नाही. व ठेविली तरी काही दिवसानी ती अवजड होतात व फुकट जातात, याकरिता केसरीचे अंक दुर्मिळ.