पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ७ गीतारहस्य २१ हजार वर्षांपूर्वीचा आहे हे ओरायन वरून किंवा स्वतंत्रपणे कबूल केल्यावर मुष्टि- मल्लयुद्धातील विजयी वीराप्रमाणे टिळकांची मनःस्थिति विजयासंबंधाने निःशंक आणि आत्मविश्वासामुळे येणाऱ्या समाधानाने प्रसन्न झाली होती. त्याना या पुढे युद्ध चालविण्याचे कारण उरले नव्हते. असे असल्याने 'वसतिस्थान' नामक ग्रंथात ते जे मागे जात जात उत्तर ध्रुवापर्यंत गेले आणि ऋषिपूर्वजांच्या दिव्य दृष्टीने सभोवार चाललेले क्षितिजावरचे उषा देवीचे नृत्य कौतुकाने पाहत राहिले याचे कारण युध्यमान बुद्धि हे नसून केवळ प्रतिभाविलास हेच होय. आर्य संस्कृति युरोपिअन संस्कृतीहून प्राचीनतर ठरल्यावर वादाला प्रति- पक्षी शिल्लक नव्हता. आर्यांची वसती मूळ उत्तर ध्रुवाजवळ नव्हती असा प्रति- . पक्ष घेऊन कोणी म्हटलेले होते असे नाही. अर्थात या संबंधाचे पुस्तक हे कोणाला उत्तर होऊ शकत नाही. पण गीतारहस्य हा ग्रंथ सर्वस्वी वादाच्या भूमिकेवर उभे राहून लिहिलेला आहे. त्यातील पूर्वपक्ष आज शेकडो वर्षे परंपरेने चालू आहे. त्याविरुद्ध उत्तर देण्याची बुद्धिं क्वचित् कोणाला झाली तर ती त्याने भीतीने जाग- व्याजागी दडपून टाकली किंवा आपल्या सिद्धान्ताकडे अर्थवादाचे स्वरूप घेऊन मुग्धता स्वीकारली. पण सत्यान्वेषणात निर्वीरमुर्वीतलम् असे का व्हावे ? कोणाला एखादे सत्य प्रतीत झाले तर त्याने ते बोलून का दाखवू नये ? परंपरेला विरोध करण्याचे भय का बाळगावे ? अधिकारप्रामाण्याला वश का व्हावे ? आचार्य पीठाविषयी आदर असणाऱ्यानेहि असा जुलूम का चालू द्यावा ? अशा विचाराने स्वकीयाशीच वाद करण्याकरिता ह्या ग्रंथात टिळक सज्ज झाले. पूर्वीच्या ग्रंथातील वाद परकीयाशी होता व हा स्वकीयाशी होता यामुळे त्यांच्या वादपद्धतीत किंवा आवेशात काही कमी पडले नाही. उलट असेच कदाचित म्हणता येईल की, ओरायन ग्रंथासंबंधाने युरोपिअन पंडितांची मते खोडून काढताना टिळकानी जितके वाग्दाक्षिण्य दाखविले तितके या 'गीतारहस्य' ग्रंथात स्वकीय प्रतिपक्षा- विषय दाखविले नाही ! ( ६ ) गीतारहस्य गीतारहस्य अथवा कर्मयोगशास्त्र हा टिळकांचा ग्रंथ त्यानी मराठीत लिहिलेला असा पहिलाच होय. पूर्वीचे दोन ग्रंथ इंग्रजी भाषेत लिहिले होते व त्याचे कारण काय असावे याची चर्चा या चरित्र ग्रंथाच्या पूर्वार्धाच्या शेवटी एका प्रकरणात आम्ही केलीच आहे. ते कसेहि असो. वर्तमानपत्रकार या नात्याने महाराष्ट्रातील लोकांचा व टिळकांचा जरी फार दिवसाचा परिचय असला तरी ग्रंथकार या नात्याने तो पूर्वी आलेला नव्हता. पण हा ग्रंथ मराठीत असल्यामुळे सर्व प्रकारच्या व सर्व दर्जाच्या वाचकवर्गाला तो समक्ष वाचावयास सापडला. टिळकांच्या विद्वत्तेविषयी लोकांची जी एक निर्विकल्पक भावना होती ती या ग्रंथवाचनाने सविकल्पक झाली. वर्तमानपत्रातील विषय प्रायः चालू राजकारणाचे. ते लिहिण्याला सामान्य