पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग १ १९१४-१९११ मधील निवडक पत्रे ४३ त्याच्या दोन प्रती तुमच्याकडे पाठवीत आहे. एक मराठ्यासाठी व एक केसरी करता. तरी हे पत्रक मराठ्यात सर्वच्या सर्व छापल्यास मी आभारी होईन. तसेच केसरीने मजवर गेल्या अंकात भयंकर आरोप केले आहेत म्हणून त्या पत्रकाचे समग्र भाषांतर केसरीतहि छापाल अशी मला आशा आहे. (२०) सोमण यांचे टिळकाना पत्र सातारा ता. २० एप्रिल १९१५. सातान्यास पूर्वी भरले तसे कॉन्फरन्स दुसरे कोठे तरी भरावे अशी अनेक मंडळींची इच्छा आहे. त्याला आमची पूर्ण मदत मिळेल. ( २१ ) .गो. कुलकर्णी यांचे टिळकाना पत्र कोल्हापूर २६ मे १९१५ काही शंकेसंबंधाने पले मत प्रमाण समजून त्याप्रमाणे तजवीज करणे- ची आहे म्हणून तसदी देत आहे याबद्दल माफी मागतो. शुक्ल यजुर्वेदी देशस्था- मध्ये मूळ पुरुषापासून तृतीयपुरुष म्हणजे मुलाचा मुलगा आणि चतुर्थ कन्या म्हणजे मुलीच्या मुलीची मुलगी यांचा विवाह करण्यास शास्त्राची काही हरकत आहे काय ? याबद्दल निर्णय आपलेकडून समजल्यास फार उपकार होणार आहेत. हा विवाहसंबंध ठरविला असता येथील यजुर्वेदी भिक्षुकानी भानगडी चालविल्या आहेत तरी याबद्दल आपलेकडून शास्त्रार्थ लिहून येईल त्याप्रमाणे करण्याचे आम्ही ठरविले आहे. म्हणजे येथील मंडळींची तोंडे बंद होतील. (२२) श्रीशंकराचार्यांचे टिळकाना आज्ञापत्र नसीराबाद २ जून १९१५ स्वारी कामगार गोविंद रामचंद्र याजबरोबर आपसातील दावा संपविण्या- विषयी व दोघानी कसे वागावे याविषयी तुम्ही पाठविलेला लेख पाहिला. मूळ दावा मांडावयास नको होता हे खरे. पण आता त्याचा काय उपयोग ? त्यावेळी आम्हास नुकताच उपदेश देऊन संस्थानास अधिकारी शिष्य केले. व इकडची हकीगत व सांप्रदाय काहीच माहीत नव्हते. म्हणून या आश्रमात वादी प्रतिवादी म्हणवून घेण्याचा प्रसंग आला आहे. पूर्वी दाजीसाहेब खरे व करंदीकर वकील यानी दावा लावण्याविषयी अनुकूल अभिप्राय दिला. लोकहि म्हणतात की शिष्य केला तरी शुरचे अधिकार नष्ट होत नाहीत. दुसरा शिष्य करता येतो व धर्मा- विरुद्ध वागणाऱ्या शिष्यास कमी करता येते. दावा दाखल होऊन लोकात असा बोभाटा झालाच आहे की शंकराचार्यांची भाऊबंदकी कोर्टात चालू आहे आणि आता वादी प्रतिवादी एक होऊन दावा काढून घेतला असता संकेश्वर मठ द्रव्या-