पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२० लो० टिळकांचे चरित्र भाग ७ म्हणण्यास हरकत नसली तर त्यात शंकास्थान कोठेहि राहिले नाही असे म्हण- ण्याची वेळ अद्याप आली नाही. तो काळ भावी संशोधकांच्या वाट्यास येईल असे मत लोकमान्यानी व्यक्त केले आहे. (५) तीन ग्रंथांची तुलना टिळकानी जे मोठे तीन ग्रंथ लिहिले त्या प्रत्येकात एक एक गुण विशेष- रूपाने नजरेस पडतो. 'ओरायन 'मध्ये ज्योतिष विषयक ज्ञान 'आर्याचे वसति- स्थान ' यामध्ये रम्य कल्पनाचातुर्य आणि गीतारहस्यात खोल तात्विक विचार. पहिला ग्रंथ विशिष्ट ज्ञान प्रचुर दुसरा प्रतिभोद्दीपित आणि तिसरा पांडित्य मंडित असा आहे. दुसऱ्या दृष्टीने असे म्हणता येईल की पहिला व दुसरा ग्रंथ सात्विक राजस व तिसरा शुद्ध राजस गुणदर्शक आहे. एकाच रत्नावर एकाच किरणाने तीन पैलूतून तीन निरनिराळ्या रंगांची छटा चमकावी त्याप्रमाणे टिळकांच्या एकाच बुद्धिमत्तेने तीन निरनिराळ्या प्रकारचे हे ग्रंथ टिळकांकडून लिहविले आहेत. पहिल्या दोन ग्रंथात प्रतिपाद्य विषय जवळ जवळ एकच आहे असे म्हटले तरी चालेल, तो विषय म्हटला म्हणजे वेदकालाचे प्राचीनत्व ठरविणे हा होय. ओरा- यनमध्ये ज्योतिर्गणिताच्या सहायाने प्रथम वेदांचा काल ४|५ हजार वर्षापर्यंत मागे नेऊन कोणत्याहि युरोपियन राष्ट्राच्या संस्कृतीपेक्षा आर्य (वैदिक) संस्कृति प्राचीनतर आहे हे टिळकानी ठरविले, पण ' वसतिस्थाना'च्या ग्रंथात वेद अनादि म्हणजे आदि न समजून येण्याइतके प्राचीनतम कसे ठरतात हे दर्शवून प्राचीन- त्वामुळे प्राप्त होणारी श्रेष्ठता आर्य संस्कृतीकडे घेतली आहे. हे दोनहि ग्रंथ वाद- बुद्धिमूलकच आहेत. पण ती बुद्धि आरोयनमध्ये जितकी स्पष्ट दिसते तितकी ' वसतिस्थान ' या ग्रंथात दिसत नाही. बॉक्सिंगच्या युद्धात दोघे सामनेवाले समोरासमोर उभे असताना त्यांच्या- 'मध्ये जी युद्धयमान बुद्धि व जिगीषा प्रेक्षकाना दिसते ती ओरायनमध्ये दिसून येते. कारण वेदाना हजार दोन हजार वर्षाहून अधिक प्राचीनत्व लाभू न देणारे प्रतिपक्षी युरोपियन पंडित हा ग्रंथ लिहिताना टिळकांच्या डोळ्यासमोर उभे आहेत. पण वेद हे चार पांच हजार वर्षापूर्वीचे असे एकदा सिद्ध केल्यावर व प्रतिपक्षी आपल्या राष्ट्राच्या तुटपुंज्या अडीच हजार वर्षांच्या संस्कृतीला उराशी घेऊन वादरण- क्षेत्राच्या टोकाशी कोलमडून पडल्यावर अधिक ठोसे लगावण्याचे कारण उरत नाही. बॉक्सिंगच्या खेळात असा एक नियमच आहे की प्रतिपक्षी जमीनदोस्त केल्याबद्दल विजयाचा दाखला पंचाकडून मिळावयाला हवा असेल तर विजयी गड्याने पड्या गड्याला सोडून बूर रंगणाच्या दुसऱ्या टोकाला जाऊन स्वस्थ उभे राहिले पाहिजे. याचा अर्थ असा की विजयाचा पूर्ण आत्मविश्वास व तन्मूलक निःशंक भावना त्याच्या ठिकाणी प्रगट झाली पाहिजे. तोच दाखला येथे लावला असता असे म्हणता येईल की जाकोबीसारख्या पंडिताने वेदांचा काल- ४/५