पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ७ वेदांग ज्योतिष १९ एक अहोरात्र (हेयं) सोडावा. केव्हा ? उत्तरः- पादांती पर्व असेल तेव्हा. पाद म्हणजे काय ? उ:- पाद म्हणजे ३१ अंश अंशांची मोजणी कशी करावी ? उ:- १२४ अंशानी भागून बाकीच्या अंशाने पादमापन करावे. " अशा रीतीने एक दिवस सोडण्याचा परिपाठ वेदकालीन पंचांगात होता हे तैत्तिरीय संहितेतील उल्लेखावरूनहि दाखविता येते. हा एक दिवसाचा संस्कार करून दृक्प्रत्यय साधण्याचा योग कधी येत होता ? या प्रश्नाचे उत्तर ९३ व्या पक्षांतीच्या रात्री असे देता येते. म्हणजे पंचसंवत्सरात्मक युगातील अनुवत्सराच्या कार्तिकी पौर्णिमेस हा संस्कार करीत असत. याचा अर्थ त्या दिवसाची तिथी अगर नक्षत्र पंचांगात मांडीत नसत. अर्थात् या दिवसाची गणना मागल्या पर्वात करावयाची किंवा प्रत्यक्ष चंद्र ज्या नक्षत्रात दिसेल ते नक्षत्र त्या दिवसाचे मानावयाचे याचा निर्णय याज्ञिकाना करणे प्राप्त होते. तो निर्णय स्युः पादोर्ध्वं त्रिपद्यायास्त्रियेः कृते स्थितिम् । साम्येनेन्दोस्तृणोऽन्ये तु पञ्चकाः पर्वसंमिताः ॥ य. १४ या श्लोकात आहे. त्यात गतपर्वांचे चतुर्थपाद आणि त्रिपद्येचे (=प्रति- पदेचे ) १२३ हे पाद यात चंद्राचे नक्षत्र एकसारखे मानावे असे कित्येकांचे मत आहे. पण पांचहि पादांची गणना पर्वात करावी असे दुसरे काही लोक मानतात. " अर्थात हा मतभेद मांगे सांगितलेल्या अधिकदिन विषयक प्रतिपदेच्या वेळचाच आहे. शेवटचा वादविषयक लोक असा आहे. श्रविष्ठाभ्यां गुणाभ्यस्तान् प्राग्विलग्नान् विनिर्विशेत् । सूर्यान्मासान् षडभ्यस्तान् विद्याच्चांद्रमसानृतून् ॥ ऋ. १९ यात उत्तरार्धाच्या अर्थाबद्दल वाद नाही. कारण 'सौर मासांची साहापट केली असता चांद्रऋतु येतात. ' हे ठोकळमानाने खरे आहे. पण सूक्ष्म गणि- ताच्या दृष्टीने हे चुकीचे आहे. ही गोष्ट दिक्षितानी आपल्या ग्रंथात स्पष्ट करून सांगितली आहे. मुख्य बाद पूर्वार्धातील 'गुणाभ्यस्तान् ' व ' प्राग्विलग्नान्' या शब्दाबद्दल आहे. गुण याचा अर्थ तीन असा बहुधा करतात. पण बार्हस्पत्याने या ठिकाणी गुण = ८ असा अर्थ मानला आहे. तो ओढाताणीचा आहे. त्याच- प्रमाणे 'लग्न' म्हणजे पूर्वक्षितिजबिंदूशी संलग्र असा राशिचक्राचा बिंदू हा अर्थ घेतल्यास; व लग्न निश्चित करण्याची पद्धति त्यावेळी होती असे मानल्यास त्यावेळी लग्नांची संख्या १२ नसून ९ असण्याचा संभव पुष्कळसा आहे. व या कल्पने- प्रमाणे " श्रविष्टेपासून तीन नक्षत्रांचे एक लग्न " असा अर्थ पूर्वार्धाचा घेता येईल.- पण हा निर्णय करण्यास वेदकालीन पंचांगविषयक माहिती आज उपलब्ध आहे त्यापेक्षा जास्त सापडली पाहिजे. तोपर्यंत वेदांगज्योतिष बहुतेक समजले असे