पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८ लो० टिळकांचे चरित्र भाग ७. यानंतर तिथिनक्षत्र निश्चित करणारा नियम तिथिमेकादशाभ्यस्तां पर्वभांशसमन्विताम् । विभज्य भसमूहेन तिथिनक्षत्रमादिशेत् ॥ य. २० असा दिला आहे. त्याचा अर्थ हाः " तिथीस ११ नीं गुणून त्यांत पर्वनक्ष- त्राचे अंश मिळवावे; आणि बेरजेस नक्षत्रसंख्येने ( २७ नीं) भागून तिथि- नक्षत्र ठरवावे. " चंद्राचे गणित सांगितल्यानंतर इष्ट तिथ्यंतीचे रवीचे स्थान काढण्याची रीति एकादशभिरभ्यस्य पर्वाणि नवभिस्तिथिम् ॥ युगलब्धं सपर्व स्याद्वर्तमानार्कभं क्रमात् ॥ य. २५ या श्लोकात दिली आहे. त्याचे तात्पर्य “ गतपर्वसंख्येची ११ पट व वर्तमान तिथीची ९ पट याची बेरीज घेतली असता ( धनिष्ठादि क्रमाने) वर्तमानरविनक्षत्र येते." असे आहे. यानंतर रवीचे पर्वनक्षत्र अगर दिननक्षत्र यांचा प्रवेशकाल आणि पर्वान्त व तिथ्यंत यांचा काल यामधील अवधि निश्चित करावयाचा राहिला. त्या संबंधीचा नियम शोधताना हे लक्षात ठेवले पाहिजे की एक नक्षत्र क्रमण्यास रवीला १३५ दिवस लागतात आणि एका तिथींत तो ९ नक्षत्रांश चालतो (ऋ. २४). त्याचप्रमाणे १ दिवस = १२४ अंश आणि १ तिथि = १२२ अंश. १ तिथि = १ दिवस - २ अंश. (ह्या अंशसंख्येला दिनोपभुक्ति म्हणतात.) किंवा १२४ अंशात्मक (नक्षत्र) चालण्यास रवीला १३ दिवस लागतात तर इष्ट अंश चालण्यास किती दिवस लागतील ? या त्रैराशिकाने उत्तर काढता येईल. या विषयीचा नियम सूर्यर्क्षभागान् नवभिर्विभज्य शेषं द्विरभ्यस्य दिनोपभुक्तिः । तिथिर्युता भुक्तिदिनेषु कालो योगो दिनैकादशकेन तद्भम् ॥ य. २६ असा आहे. त्यांत 'तिथि:'च्या जागी तिथेः असा पाठ घेऊन लोकाचा सारांश हा. " सूर्य नक्षत्राच्या अंशाना ९ नीं भागावे ( भागाकार गततिथिसंख्या निदर्शक असतो ). नंतर बाकीची दुप्पट करून तिथींची दिनोपभुक्ति मिळवावी. म्हणजे रोजचे ११ अंश या नियमाने नक्षत्राचा प्रवेशकाल येतो. " बार्हस्पत्य व सुधाकर यांचे ऐकमत्य असून लोकमान्यांचा मतभेद असलेला लोक असा आहे. दुयं पर्वचेत्पादे पादस्त्रिंशत्तु सैकिका । भागात्मना वपृज्यांशान् निर्दिशेदधिको यदि ||. य. १२ या ठिकाणी 'दुद्देयं ' या जागी लोकमान्यांच्या मते ' द्यु हेयं' असा पाठ मानला पाहिजे. आणि हा पाठ घेऊन श्लोकार्थ असा सांगता येईल. " (द्यु)