पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ७ वेदांग ज्योतिष १५ पर्वाच्या अंती चंद्र व सूर्य यांचे ( नक्षत्रांश म्हणजे ) स्थान सहज ठरविता येते. पंचसंवत्सरात्मक एका युगात १२४ पर्व असतात व प्रत्येक पर्वोती चंद्रसूर्य कोणत्या अंशावर असतात याचे साद्यंत गणित कै. दीक्षित यानी दिले आहे व त्यातील तत्त्व बार्हस्पत्य व द्विवेदी यानाहि मान्य आहे. पण गणिताची रीत निर्विवाद असली तरी ती या श्लोकातून कशी निघते हे कोडे पूर्वीच्या संशोधकाना उल- गडले नव्हते; याचे कारण 'ऊन या शब्दाचा अर्थ त्यांच्या लक्षात आला नव्हता हे आहे. 'ऊन ' याचा अर्थ भागाकारात राहणारी 'बाकी ' असा या ठिकाणी केला पाहिजे ही लोकमान्यांची सूचना मान्य केल्यास आणखी काही श्लोकांची संगति लावणे सोपे जाते. चंद्रसूर्याचे पर्वान्तीचे स्थान निश्चित केल्यानंतर या पर्वाशावरून चंद्राच्या पर्वनक्षत्राचा 'कलात्मक ' प्रवेशकाल काढण्याची रीति अशी आहे. कार्याः भांशाष्टकास्थाने कला एकान्नविंशतिः । ऊनस्थान द्विसप्ततीरुद्वपेद् ऊनसंमिताः ॥ १२४ = ऋ. ११; य. १९ याचा अर्थ " नक्षत्रांशाच्या प्रत्येक आठक्यास १९ कला आणि ऊनाच्या आंकड्यात ऊनाची ७२ पट मिळवावी. ” यात लोकाच्या पूर्वार्धाबद्दल वाद नाही. कारण एका युगात १२४ पक्ष व तेवढ्यात चंद्र १८०९ नक्षत्रे चालतो; तेव्हा १२ पक्षात तो १८०९१९ १७५२ नक्षत्रे चालतो. चंद्रास १ नक्षत्र चालण्यास १ दिवस व ७ कला लागतात; त्या अर्थी १७५ नक्षत्रे संपवून १७६ व्या नक्षत्राचा प्रवेशकाल १७७ दिवस व १९ कला असा येतो. यावरून पुरे दिवस सोडून कलांचा हिशेब करावयाचा असल्यास बारा पक्षांच्या अंतीच्या नक्षत्राचा प्रवेशकाल १९ कला असा सांगता येईल, अशा रीतीने या श्लोकातील पूर्वाधांची उपपत्ति चांगल्या रीतीने लागते व त्यात 'भांशाष्टकास्थाने' याचा संबंध पूर्वी दिलेल्या 'पक्षद्वादशकोद्गत ' 'भांशाष्टका' शी आहे असेहि ठरते. या श्लोकातील उत्तरार्धांची उपपत्ति मात्र बार्हस्पत्य याना चांगली लावता आली नाही; याचे कारण त्यात दोन वेळा आलेला 'ऊन ' शब्द त्याना सम- जला नाही. लोकमान्यांच्या मते 'ऊन ' याचा अर्थ 'बाकी' असा घेऊन या उत्तरार्धात चंद्राचा नक्षत्रप्रवेशकाल काढण्याची रीत अर्धीच दिली आहे; व तिची पूर्ती पुढच्या लोकात झाली आहे. उदाहरणार्थ १८ व्या पक्षांच्या अंतीच्या नक्षत्राचा प्रवेशकाल काढावयाचा आहे असे समजल्यास १८ पक्ष = १ द्वादशक + ६ ऊन पैकी श्लोकाच्या पूर्वार्धावरून १ द्वादशका अखेरचा नाक्षत्रप्रवेशकाल १९ कला हा आला; तेव्हा ऊन पक्षापुरतेच गणीत करावयाचे राहिले, त्यास प्रारंभी उत्तरा-