पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४२ ० भाग १ करून पाठविलेच आहेत. तथापि सुचतील ते आणखी तुम्हीहि विचारावे. गोस्वामी लोकानी वर्गण्या जमवून दाव्याला जोर आणला आहे. मॅजिस्ट्रेट ख्रिस्ती आहे. निकाल त्यांच्याविरुद्ध झाला तरी इकडे मानभाव लोकांचे प्रस्थाहि बरेच आहे. एकंदरीने मला असे वाटते की टिळक व डॉ. भांडारकर यांच्या मध्य- स्थीने हा तंटा तोडण्याचा काही प्रयत्न तुम्ही कराल तर फार चांगले होईल. (१७) मोतिलाल घोस यांचे टिळकाना पत्र कलकत्ता २१ डिसेंबर १९१४ मी कलकत्त्यास आलो तो आता देवघरला परत जात नाही. भूपेंद्र बोस यांच्याशी बोललो. आमचा विचार असा आहे की केळकर मुंजे खापर्डे याना येथे सल्लामसलती करिता बोलवावे. बंगाल्यात दोन पक्षातील भेद फार तीव्र नाही. गोखल्यानी संमति दिली तर बेझंटवाई आपले मत बदलतील. आम्ही इकडचे लोक हवे तसे निवडून येऊ शकू व समेटाला राष्ट्रीयसमेत मदत करू. (१०) विजापूरकर यांचे टिळकाना पत्र थोडक्यावर लग्न मोडल्यासारखे होत आहे म्हणून सभा बोलाविण्यास तयार होणान्या मंडळीनी आर्टिकल कबूल करावे असे मला वाटते. प्रवेशानंतर व्यव- स्थित प्रयत्न करून सर्व काही करता येईल. फेरोजशहा मेथा हे त्याना वाटा- घाटीत वगळले म्हणून रागावलेले दिसतात. त्यांचा गड सर करण्याच्या तीन पायऱ्या गोपाळराव गोखल्यानी सुचविल्या त्या अशा. गोखल्यानी सुचविले त्यावर येथील मंडळींचे ऐकमत्य झाल्यावर नरसोपंतानी सर फेरोजशहा यांजकडे जावे म्हणजे त्याना तिकडचा कोणीतरी येऊन आपला मान राखल्यासारखा वाटेल. दुसरी पायरी ही की सुबराव पंतलु यानी येथे ठरेल तेच मुंबईस बोलावे. तिसरी पायरी गोपाळरावानीहि त्यांच्याशी बोलून खटपट करावी व आपले स्वच्छ मत कळवावे. इतके झाल्यावर फेरोजशहा हट्ट धरणार नाहीत असे गोखले याना वाटते, फेरोज- शहा मद्रासेस येणार नाहीत. वाच्छाहि नाहीत. अशा स्थितीत प्रकृतीमुळे जाऊ नये असे वाटले तरी जाऊन खटपट करू. मग जड जाणार नाही. गोपाळ- रावांच्या मनात समेट व्हावे असे आहे. नड मात्र ती. तिला उपाय तेवढेच दिसतात. तुमच्या 'सांकशनाने' सभा भरवून येऊ. पुढे हा समेट करा असे थोड- क्यात म्हणणे असावे. बाईची मध्यस्थी मला स्वतःलाच आवडली नाही. (१९) ना. गोखले यांचे केळकराना पत्र पुणे. १० फेब्रुवारी १९१५ काँग्रेस समेटासंबंधाने मला एखादे जाहीरपत्रक काढून आपले म्हणणे लोकाना कळविणे अपरिहार्य झाले आहे. म्हणून असे जाहीरपत्रक काढले आहे.