पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ७ वेदांग ज्योतिष ११ कालीन ज्योतिष्याला सामान्य गणिताने तिथी नक्षत्र वगैरे गोष्टी काढता येत असत. तसेच त्यामध्ये स्तवन चांद्र नाक्षत्र व सौर अशा निरनिराळ्या काल- गणनांचा मेळ घालण्याची व्यवस्था केलेली आहे. सूर्य व चंद्र हे धनिष्ठामध्ये असता तेथून गणनारंभ करावा व राशिचक्राचे २७ सारखे भाग कल्पून त्या प्रत्येकातील मुख्य तारकेला वेगवेगळे नक्षत्रनाम द्यावे वगैरे व्यवस्था वेदांग ज्योतिषात आहे. या ग्रंथात निरनिराळ्या ऋतूंचा प्रारंभ केव्हा होतो हे दिले आहे. पण त्याच्या कर्त्याला अयनगतीची माहिती नव्हती. यामुळे ऋतूंची आरंभ- स्थाने या ग्रंथात सांगितली तशीच अनुभवाला येत नाहीत. राशि हा शब्दहि वेदांग ज्योतिषात येतो. पण ज्याना आपण बारा राशी असे म्हणतो त्याच्या कल्पनेशी त्या शब्दाचा काही संबंध नाही. तर तो शब्द केवळ संख्यावाचक आहे ! वेदांग ज्योतिषातील ग्रहगतीचे मान व तदनुसार कालगणना ही अर्थात फार स्थूल होती. यामुळे त्यावरून कालगणना चालू ठेवणाराना चुका आढळून येऊ लागल्या विरोध दिसू लागले व फरक पडू लागले. परंतु शं. बा. दीक्षित यानी असे सिद्ध केले आहे की वेदकाली जे पंचांग सुरू होते तेच त्यानंतर वैदिक वाङ्म याच्या ब्राह्मण निर्दिष्ट कालातहि प्रचलित होते. दोन्ही काळी नक्षत्रांची संख्या क्रम एकच होता. फक्त वेदांग ज्योतिषात धनिष्ठा नक्षत्री युगारंभ मानिलेला आहे तो ब्राह्मणकाली व संहिताकाली तसा मानिलेला नाहीं.

  • ऋग्वेदीय व यजुर्वेदीय असे वेदांग ज्योतिषाचे दोन पाठ आहेत. पैकी ऋग्वेदी पाठ वैदिकांच्या म्हणण्यात आहे तसा यजुर्वेदी नाही. भारती- यांच्या ज्योतिषविषयक ग्रंथात वेदांग ज्योतिषाइतका प्राचीनग्रंथ उपलब्ध नाही. यामुळे ऐतिहासिक दृष्टीने प्राचीनत्वाचा मान तर या ग्रंथास आहेच. पण यातील अयनविषयक उल्लेखामुळे त्याचा रचनाकाल ठरविण्याचेहि साधन मिळते. ही त्यातील विशेष महत्त्वाची बाब आहे. या विशेषामुळेच कोलबुक जोन्स वगैरे युरोपियन संशोधकांचे लक्ष वेदांग ज्योतिषाकडे फार पूर्वी- पासून वेधले. जार्व्हिसने इ. स. १८३४ मध्ये ऋग्वेदी पाठ Indian Metrology या ग्रंथात छापला आणि वेबरने १८७२ मध्ये दोनहि पाठांच्या हस्तलिखित पोथ्या मिळवून या ग्रंथाची संहिता लोकापुढे मांडली. परंतु व्याकरणदृष्ट्या या ग्रंथात अनेक अशुद्ध पाठ फार पूर्वीपासून शिरले आहेत. यामुळे व ग्रंथातील भाषेत संक्षेपाकडे विशेष लक्ष दिले गेल्यामुळे यातील फारच थोड्या लोकांचा अर्थ त्या वेळच्या संशोधकाना लावता आला. त्यानंतर डॉ. थिवो यानी इ. स. १८७७ मध्ये वेदांग ज्योतिषातील काही लोक लावले. आणि कै. शंकर बाळकृष्ण दीक्षित
  • वेदांग ज्योतिषावरील टिळकांच्या निबंधाचा यापुढील सारांश या विषयाचा परि श्रमपूर्वक व आवडीने अभ्यास करणारे आमचे स्नेही श्री. दत्तोपंत आपटे यानी आमच्या विनंतिवरून लिहून दिला ही गोष्ट येथे नमूद करणे अवश्य आहे आणि हे सहाय्य केले याकरिता आम्ही त्यांचे आभारी आहो.

ग्रंथकर्ता