पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२ लो. टिळकांचे चरित्र या भाग ७ यानी यापुढे बरीच मजल मारून इ. स. १८९६ मध्ये बऱ्याच लोकांचा अर्थ लावला व वेदांगज्योतिषातील गणिताची उपपत्ति 'भारतीय ज्योतिःशास्त्र ' ग्रंथात प्रसिद्ध केली. तथापि वेदांगज्योतिपातील १२ श्लोक त्यानाहि लागले नव्हते. त्यातले बरेच लावण्याचा प्रयत्न लाला छोटेलाल यानी केला आणि १९०६ मध्ये त्यानी ' बार्हस्पत्य' या टोपण नावाने हिंदुस्थानरिव्यू मध्ये आणि १९०७ मध्ये ग्रंथरूपाने सर्व लोकांचा अर्थ देऊन प्रसिद्ध केला. अर्थात त्यानी दिलेल्या अर्थावर आक्षेप घेण्यास अनेक ठिकाणी जागा होती तिचा फायदा घेऊन काशीस्थ पंडित सुधाकर द्विवेदी यानी वेदांगज्योतिषाची नवी आवृत्ती काढली. त्यात लोकाखाली 'सुधाकरभाष्य' या नावाची नवीन अर्थबोधिनी टीका देऊन 'सोपाकरभाष्य' नावाची जुनी टीकाहि संग्रहीत केली. ही टीका १९०८ मध्ये प्रसिद्ध झाली. तिच्यात लाला छोटेलाल यांच्या ग्रंथातील दोषस्थले सांगण्याचा प्रयत्न ठिकठिकाणी केलेला आहे. द्विवेदी यानी सुचविलेले नवीन अर्थ मान्य करण्यास मुख्य अडचण ही आहे की त्यानी प्रचलित पाठ सोडून नवीन काल्पनिक पाठ घेऊन अर्थ लावला आहे. तथापि द्विवेदी यांच्या ग्रंथामुळे लाला छोटेलाल यांच्या ग्रंथावर कोणकोणत्या ठिकाणी आक्षेप घेण्यास जागा आहे हे समजून घेण्यास एक चांगले साधन निर्माण झाले. वेदांगज्योति- षाच्या वादास वर सांगितल्याप्रमाणे स्वरूप आले त्या सुमारास टिळकाना मंडालेच्या तुरुंगाकडे रवाना करण्यात आले. कैदेत जाण्यापूर्वी वरील दोनहि विद्वानांची पुस्तके त्यांच्याकडे अभिप्रायार्थ आली होती. यामुळे त्या ग्रंथाचे सूक्ष्म अध्ययन करून वादविषयक बारा लोकांचा अर्थ लावण्यासंबंधी आपले मत काय आहे ते टिळकानी आपल्या या पर्यालोचनात्मक व अभिप्रायात्मक लेखात नमूद केले आहे. वेदांग ज्योतिषाचे सूक्ष्म अध्ययन करताना टिळकानी प्रथम सर्व श्लोकांची वर्णानुक्रमसूची तयार करून त्यात शंकर बाळकृष्ण दिक्षित यांच्या वेळे- पर्यंत कोणते श्लोक लागले होते व वाद कोणत्या श्लोकासंबंधी राहिला होता हे नक्की ठरविले. त्या वेळचे टिळकांच्या हातचे एक टिपण कित्येकांच्या पाहण्यात आहे ते येथे देतो. त्यात पहिल्या रकान्यात अक्षरानुक्रमाने श्लोकांचा प्रथम चरण, दुसऱ्या रकान्यात याजुष ज्योतिषातील श्लोकाचा अनुक्रमांक, तिसऱ्यात ऋक् ज्योतिषातील अनुक्रमांक आणि चौथ्यात दिक्षिताना कोणता श्लोक लागला होता हे स्पष्टपणे दाखविण्यासाठी 'दि' हे अक्षर योजले आहे. त्याचप्रमाणे टिळ- कानी विवेचलेले लोक कोणते हे समजण्यासाठी डावीकडील अनुक्रमांक जाड्या टाईपात घेतला आहे.