पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१० लो० टिळकांचे चरित्र भाग ७ ( ४ ) वेदांग ज्योतिष 'वेदांग ज्योतिष' हा प्रबंध वरील दोन प्रबंधाहून पुष्कळच मोठा आहे. त्याची सुमारे छापील १०० पाने झालेली आहेत. पहिल्या भागात या विषयाची प्रस्तावना टिळकानी लिहिली आहे तीत ते म्हणतात-"वेदोत्तरकालीन इतिहासाच्या व वाङ्मयाच्या अनुपूर्वीचा निश्चय करण्याला अनेक खुणा मिळतात तशा वेदकालासंबंधी मिळत नाहीत. युरोपियन पंडितानी वैदिक वाङ्मयाचे निरनिराळे थर पृथ्वीच्या पोटातील थराप्रमाणे मानलेले असून प्रत्येक थर बनण्याला अमुक एक वर्षे लागतील असे गृहीत धरून कालगणना केली आहे. पण त्याप्रमाणे वेदकाल खिं. पू. २५०० वर्षाहून मागे जात नाही. म्हणून ओरायन किंवा अग्र- हायन या नावाच्या ग्रंथात यातील चूक मी दाखवून दिली आहे. प्रो. जॅकोबी यानीहि माझ्याप्रमाणे वेदाचा काल ४|| ते ५ हजार वर्षांइतका जुना ठरविला आहे. दोघानीहि मुख्यतः आधार घेतले ते वेदातील ज्योतिर्गणितवाचक शब्दांचे. अनेक युरोपियन पंडितानी भारतीय ज्योतिषशास्त्रासंबंधाने लेख लिहिलेले आहेत. अर्थात् वेदांग ज्योतिष हा जो त्यातील सर्वात प्राचीन ग्रंथ त्याचाहि त्यानी विचार केला. पण त्याच्याहि पूर्वी ज्योतिर्गणितासंबंधी विचार करणारे किंवा उल्लेख करणारे अनेक प्रबंध असले पाहिजेत. या विषयावर निरनिराळ्या युरो- पियन पंडितांचे झालेले वाद सांगण्याचे कारण नाही. त्यातील चर्चा मुख्यतः वेदोत्तरकालीन ज्योतिषग्रंथाविषयी आहे. प्रत्यक्ष वेदातील ज्योतिषविषयक उल्ले- खांची चर्चा थोडी आहे. प्रो. वेबर यानी वैदिक नक्षत्रावर १८६०-६२ साली दोन ग्रंथ प्रसिद्ध केले. त्यानी बहुतेक सर्व उल्लेखांचा संग्रह केला आहे. व त्यानंतर आणखी सापडलेले ज्योतिषविषयक उल्लेख फारच थोडे आहेत. फक्त नक्षत्र- चक्राचा प्रारंभ कृत्तिकापासून असल्याचे वेबर याने मानिले ते चूक असून मृग- शीर्षापासून तो प्रारंभ मानिला पाहिजे. व तसे झाले असता वेदाचे प्राचीनत्व ४|५ हजार वर्षापर्यंत मागे जाते ही गोष्ट निराळी. इतके सांगितल्यावर टिळ- कानी इकडील पंचांग शोधनाचा थोडासा इतिहास दिला आहे पण तो पूर्वी अनेक ठिकाणी आल्याने आम्ही येथे त्याचा पुनः उल्लेख करीत नाही. दुसऱ्या भागात टिळकानी वेदकालीन पंचांगाची माहिती दिली आहे. हे पंचांग वेदाचे एक अंगच मानितात. आणि वेदपठणामध्ये संहितेनंतर जी अंगे वेदपाठी म्हणतात त्यात वेदांग ज्योतिषाचाहि भाग म्हणतात. युरोपियन पंडितानी वेदांग ज्योतिष छापले आहे. पण त्यांतील काही थोड्या लोकांखेरीज बाकीच्यांचा त्याना अर्थ कळला नाही. त्यामुळे त्यानी त्याला योग्य ते महत्त्वहि दिले नाही. परंतु कै० शंकर बाळकृष्ण दीक्षित लाला छोटेलाल पं. सुधाकर द्विवेदी यानी त्यातील पुष्कळसे श्लोक लावून दाखविले व त्यावरून वेदकालीन पंचांग कसे होते हे चांगले कळून येते. वेदांग ज्योतिष हा मोठा सिद्धांत ग्रंथ नव्हे. परंतु त्यावरून वेद-