पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ७ सांडलेली सांख्यकारिका 20 असल्यामुळे सगुण अशा जगताच्या उत्पत्तीचे ते कारण होऊ शकत नाही. आणि काल व स्वभाव हे व्यक्त असल्यामुळे तेहि अव्यक्त अशी जी प्रकृति तिच्या पूर्वी असणे शक्य नाही अशी ही अनुमानपरंपरा आहे. टिळक म्हणतात " हे भाष्य वाचताना मला अशी कल्पना आली की वर जी चार इतर मानीव कारणे सांगून त्यांचा परिहार केला ती भाष्यकाराने आपल्याच जबाबदारीवर उल्लेखिली नसली पाहिजेत. उलट ' तत्र सुकुमारतरं वर्णयति' या भाष्यातील शब्दावरून वर्णन करणारा हा स्वतः भाष्यकार असा अर्थ अभिप्रेत नाही तर मूळ कारिका रचणारा असाच असला पाहिजे. शिवाय भाष्यात 'इतर कारणे इतर कोणी मानतात' अशा अर्थाचे शब्द आहेत. व ते प्रती- कात्मक असावेत. म्हणून असे वाटते की हल्ली नष्ट असलेली एकादी कारिका गौडपादाच्या डोळ्यापुढे असावी व तीत इतर मानीव कारणांचा उल्लेख असल्यामुळे ६ १व्या कारिकेत तुलनात्मक असा 'सुकुमारतर' हा शब्द घातला असावा. २७ व्या कारिकेवरील भाष्यातहि या चार कारणांची चर्चा आलेली आहे. परंतु तेथे 'सुकु- भारतरं वर्णयति' असे शब्द आलेले नाहीत. व त्या ठिकाणी या चार कारणांचे पद्धतशीर खंडनहि नाही. यावरून हल्लीच्या ६१ व्या कारिकेपुढे हल्ली अनुपलब्ध असलेली कारिका असावी. या कारिकेचे शब्द प्रत्यक्ष कोणते असतील हे सांगणे कठीण आहे. तथापि खाली दिल्याप्रमाणे ती कारिका असावी निदान तशी ती लिहिली असता उस कारिकेतील अर्थ बरोबर येईल असे वाटते. व ती नवी रचलेली कारिका वर सांगितल्याप्रमाणे ' कारणमीश्वरमेके' इ० ही असावी. कारण या दोन ओळीत इतर चारी कारणांचा उल्लेख असून परिहारहि येतो. आणि अशी कारिका नसेल तर सांख्यांच्या मुख्य सिद्धांताचा उल्लेख अपुरा व अस्पष्ट राहणार. नवीन सुचविलेली कारिका ही केवळ संख्येची भरती करण्याकरता नव्हे तर विषयपूर्ततेकरताहि अवश्य आहे. भाष्याचा हा भाग प्रक्षित नाही. चिनी भाषांतरात हा सर्व विषय स्पष्ट व अधिक सविस्तरहि आहे. व पूर्वपक्ष उत्तरपक्ष दर्शक शब्द म्हणजे 'अपरे ब्रुवते' 'अत्र आहुः ' या शब्दाची भाषांतरे चिनी- वरून केलेल्या फ्रेंच भाषांतरात आहेत. फक्त त्या भाष्याचे मूळचे संस्कृत शब्द आज उपलब्ध नाहीत. श्वेताश्वतर उपनिषदामध्ये स्वभाव काल ईश्वर इत्यादि कारणांचा उल्लेख असून फक्त ईश्वर हेच कारण उपनिषदाने निश्चित केले आहे. पण ईश्वरकृष्ण हा निरीश्वरवादी आहे. म्हणून तो ईश्वर हे कारण मानीत नाही. ते कसेहि असो. अशा प्रकारची चर्चा जी उपनिषदात आहे ती सांख्य कारिका- तहि असणारच. आणि ती चर्चा हल्लीच्या ६९ मुख्य कारिकात कोठेहि नाही. म्हणून सांडलेली सत्तरावी कारिका 'कारणमीश्वर मेके' या किंवा त्याच अर्थाच्या शब्दानी रचलेली मुळात असली पाहिजे.”