पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८ लो० टिळकांचे चरित्र भाग ७ णारा गौडपाद हा शंकराचार्यांचा गुरु जो गौडपाद तोच असावा किंवा काय या विषयी मतभेद आहे. ते कसेहि असो. या कारिका व त्यावरील एक भाष्य यांचे चिनी भाषेत भाषांतर 'परमार्थ' याने केलेले आहे. हा भाषांतरकार बौद्धधर्मी होता. गौड- पादाचे भाष्य उपलब्ध आहे पण हे दुसरे उपलब्ध नाही. सांख्यतत्त्वकौमुदी या नावाची एक टीका याच कारिकांवर आहे ती 'वाचस्पति मिश्र' याने लिहिली आहे. ती तितकी प्राचीन नाही. वुइल्सनसाहेबाने छापलेल्या कारिकांच्या प्रतीत एकंदर ७२ आर्या आहेत. त्यातील शेवटल्या तिहीत ईश्वरकृष्ण याची गुरुपरंपरा वर्णिलेली आहे. आणि 'मी ईश्वरकृष्ण याने षष्ठितंत्रावरून सत्तर आर्यात सांख्यशास्त्र आणले' असे लिहिले आहे. पण या उल्लेखावरून एक विरोध उत्पन्न होतो. एकंदर छाप- लेल्या कारिका ७२. स्वतः ईश्वरकृष्ण म्हणतो की मूळ ग्रंथ ७० आर्याचा आहे. पण वरीलप्रमाणे तीन आर्या अवांतर म्हणून सोडून दिल्या तर फक्त ६९ उर तात. तसेच गौडपादाचे भाष्य पाहिले तर तो स्वतः त्यात ७० कारिका आहेत असे स्पष्ट लिहितो. पण त्याच्या भाष्याची शेवटची कारिका संख्येने ६९ वी आहे. अर्थात् या सत्तरातील एक कारिका अनुपलब्ध खरी. मग ती कोणत्याहि रीतीने सांडली गहाळ झाली असो. पण शेवटल्या तीन कारिकांतील एक जमेला धरून ७० कराव्या हे कोणाहि संपादकास किंवा संशोधकास मान्य नाही. दुसरे पक्षी चिनी भाषांतरात फक्त ७१ कारिका आहेत पण वुइल्सनच्या प्रतीतील ६३ वी कारिका त्यात नाही. ती अर्थातच चुकीने गळलेली असावी व तसे मानले असता चिनी भाषांतरातील मूळ कारिकाहि ७२ च असाव्यात. पण संस्कृतात जसे या कारिकाना आर्याप्तति असे नाव आहे तसेच चिनीत सुवर्णसप्तति असेच आहे. यावरून मुख्य विषयात्मक ग्रंथाच्या सत्तर आर्या असाव्या हे निर्विवाद सिद्ध होते. मग ही सांडलेली गळलेली कारिका कोणची असावी १ टिळकांच्या मते ती हल्लीच्या ६१ व्या व ६२ व्या कारिकांच्या मध्यंतरी असावी. व ती गळली किंवा सांडली नसती तर हल्लीच्या ६२ व्या कारिकेला ६३ हा आकडा मिळून पुढे त्या क्रमाने क्रमांक चालू झाला असता. ६१ वी कारिका अशी आहे- प्रकृतेः सुकुमारतरं न किंचिदस्तीति मे मतिर्भवति या दृष्टास्मीति पुनर्नदर्शनमुपैति पुरुषस्य ॥ याचा अर्थ असा की “प्रकृतीहून अधिक सुकुमारतर (सूक्ष्म) असे काही नाही. सांख्यतत्त्वज्ञानाप्रमाणे प्रकृति हेच जगाचे मूळ कारण आहे. पण सुकुमार- तर हा शब्द तुलनात्मक असल्यामुळे तुलनाविषयक अशी इतर काही जगत् कारणे असली पाहिजेत. म्हणजे ती आहेत असे इतर कोणी म्हणत असले पाहिजे व त्या म्हणण्याचा परिहार करून तुलनात्मक अनुमानपद्धतीने प्रकृति हेच खरे जग- त्कारण शिल्लक उरते असा सिद्धांत बांधला गेला असला पाहिजे, अशी इतर कारणे म्हणजे ईश्वर पुरुष काल आणि स्वभाव ही कोणी मानीत असल्याचे गौड- पादाच्या भाष्यावरून दिसते. पण पहिलो दोन म्हणजे ईश्वर व पुरुष द्दे निर्गुण