पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ७ सांडलेली सांख्यकारिका ७ शब्द मूळ वैदिक असावा व खाल्डियन लोकानी तो संस्कृत आर्यापासून घेतला असावा. सिन्धू हा शब्द असा घेतला हे सिद्धच आहे. पाताळातील समुद्रात देव- दानवांची युद्धे झाल्याची कथा संस्कृत वेदाप्रमाणे खाल्डियन वेदातहि आहे. इकडे वृत्र तसा तिकडे तैमात. संस्कृत वेदातील अप्सुजित हा शब्द खाल्डियन वेदातील अफजू या शब्दाजवळजवळ आहे. अफजू हा खाल्डियन दैत्य व मार- दुक हा खाल्डियन इंद्र. त्यांचे युद्ध पाताळातील समुद्रातच झाले, उरू हा शब्द खाल्डियन व संस्कृत वेदात एकच आढळतो. 'सिनि वाली' हा शब्द तसाच आहे. खाल्डियन इतू व वेदिक ऋतू हेहि लक्षणार्थाने असेच जवळजवळ आहेत. आणि शब्द जवळजवळ असण्याचे कारण त्यांच्या कल्पना जवळजवळ हे होय. आमच्या इकडील सत पाताळ व सप्त स्वर्ग यांची कल्पना खाल्डियन वाङ्मयात आढळते. शेषाप्रमाणे खाल्डियन तैमात सर्पालाहि सात डोकी होती. व इन्द्र हा जसा सप्ताहन् म्हणजे सात डोक्यांच्या सर्पाला मारणारा तसाच मार्दुक हाहि तैमा ताला मारणारा आहे. या निबंधातील विचारसरणी व मुख्य विषय वरीलप्रमाणे आहे. तथापि त्यात विचार केलेले व विचिकित्सिलेले सगळे शब्द येथे दिले नाहीत. वरील शब्दा- वरून निघणारी अनुमाने बरोबर असतील तर त्यांवरून खाल्डियन य संस्कृत आर्य या दोन्ही वंशांचे मूळ वसतिस्थान एकच असावे असे अनुमान करण्यास जागा आहे. व खाल्डियन वेद आणि भारतीय वेद यांचा तुलनात्मक अभ्यास केला तर दोहोनीहि परस्परांपासून शब्द व कल्पना घेतल्या असल्या पाहिजेत हे अधिकाधिक दिसून येईल. (३) सांडलेली सांख्यकारिका या लहानशा निबंधात टिळकानी अनुमानाने स्वतः एक सांख्यकारिका बनवून दिली आहे. ती अशी- कारणमीश्वरमेके पुरुषं कालं परे स्वभावं वा । प्रजाः कथं निर्गुणतो व्यक्तः कालः स्वभावश्च ॥ ही कारिका नवीन बनविण्याचे कारण सांगणे हाच या निबंधाचा हेतू आहे व ती कारणे अशी. "ईश्वरकृष्ण याच्या सांख्यकारिका हा सांख्य तत्त्वज्ञानावरील सर्वात जुना ग्रंथ होय. कित्येकांच्या मते सांख्य प्रवचनसूत्रे ही कारिकाडून जुनी आहेत. पण दोहोंची तुलना करिता त्यातील अर्थ शब्दशः सारखाच आढळतो. फरक इतकाच की सूत्रे गद्यात्मक आहेत आणि कारिका या आर्यावृत्तात आहेत. सांख्य तत्त्वज्ञान हे जगाची उत्क्रांति वर्णन करणारे शास्त्र असल्यामुळे युरोपियन पंडितानी त्याकडे पुष्कळ लक्ष दिले आहे. कारिकांची भाषांतरे लॅटिन जर्मन फ्रेंच इंग्लिश या भाषात झाली आहेत. या कारिकांवर भाष्य लिहि-