पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लो० टिळकांचे चरित्र भाग ७ आला असेल. याच्या उलट खाल्डियन लोकापासून वेदकालीन लोकानी घेत- लेला ' मण ' हा शब्द असावा. १९०७ साली एशिया मायनरमध्ये संशोधकानी · खणती लावून काही वस्तू काढल्या त्यात 'हितिती' लोकांचा राजा व 'मितानी' राजा यांच्यामध्ये झालेला एक तहनामा निघाला आहे. त्याचा काल ख्रि. पू. १४०० वर्षांचा असावा. या तहात उभय राष्ट्रांच्या देवतांची नावे आहेत. त्यात पित्र वरुण इन्द्र अश्विन वगैरे वैदिक नावे आहेत. वरील राजे पर्शियन होते. भारतीय नव्हते. तथापि देवांची नावे वैदिक यात शंका नाही. याच क्रमाने १४०० च्या पूर्वीहि बरेच जाता येते. आणि असे आढळते की आपल्या अथर्व वेदातील पुष्कळसे शब्द या खाल्डियन वेदसंहितेतील आहेत. भारतीय लोक देव पूजक व सविभूतिपूजक. याच्या उलट खाल्डियन वगैरे लोक हे भूतपिशाच्च राक्षस यांची पूजा करणारे आढळतात. अथर्व वेदात मंत्र तंत्र जारण मारण उच्चाटन विषप्रयोग जादूटोणा अशा प्रकारच्या आचारविचारांचा भरणा पुष्कळ आहे. आणि अथर्व वेद हा मूळचा भारतीय नसावा. कारण ऋक् यजुः साम हेच तीन मुख्य वेद होत व या तिहींना मिळून वेदत्रयी म्हणतात. आणि त्यातील धर्म तो त्रयी धर्म. अथर्व वेद हा या तिहीहून अर्वाचीन आहे. तरी ब्राह्मणे व उपनिषदे यांत अथवीचा उल्लेख असल्यामुळे तो दोनतीन हजार वर्षापूर्वीचा असला पाहिजे. या अथर्व वेदात तैमात आलिगी विलिगी उरुगुलाय ताबूव वगैरे शब्द सापडतात. त्यांचा उच्चारच विदेशीय असा कानाला लागतो. तैमात वगैरे शब्द येणारे मंत्र विष उतरविण्याच्या प्रयोगात म्हणतात. हे कित्येक शब्द सर्प वाचक आहेत. मात्र या पलीकडे या शब्दांचे ज्ञान नव्हते. पण इष्टिकालेख साप- डल्यापासून याविषयी ज्ञान अधिक झाले आहे. तैमात अपोदक वगैरे शब्द सर्प- चाचक होत. पण सृष्टीच्या उत्पत्तीसंबंधीच्या कथातून ते येतात. हे शब्द वैदिक लोकानी घेतले तेव्हा ते आणि खाल्डियन लोक हे बरेच निकट रहात असावेत निदान त्यांच्यामध्ये व्यापाराचे दळणवळण असावे. या संसर्गाने तिकडचे शब्द व नाहे आले आणि यज्ञात्मकधर्म अपभ्रष्ट होताना त्यात ते मंत्ररूपाने शिरले असावे. जारण मारणादि विद्या अर्थात् हीन मानली गेली आहे. त्यातूनहि ती विदेशो म्हणून अथर्व वेदाला कमीपणा सहजच येतो. अथर्व वेदात असे इतर अनेक विदेशीय शब्द आहेत. कैरात हा शब्द असाच म्हणजे किरात नावाच्या रानटी लोकासंबंधीचा असून तोहि सर्पवाचक आहे. बायबलातील जुन्या करारा- मध्ये सांगितलेल्या सृष्टीच्या उत्पत्तीचा व प्रळयाचा प्रकार खाल्डियन लोकापासू- नच घेतला आहे. व हा शोध लागला तेव्हा ख्रिस्ती भट पंडितात मोठी चळवळ झाली. पण बायबलातील इतर काही प्रसंग म्हणजे स्वर्गातील मनुष्याचा अधः- पात सर्पाने ईव्हला केलेला वामोपदेश इत्यादि हेहि खाल्डियन लोकापासून घेतलेले असावे. ख्रिस्ती जिद्दोव्हा हा शब्द खाल्डियन यव्हे हाच होय. व या शब्दाजवळजवळ असणारे असे अनेक शब्द संस्कृत वेदातहि आहेत. म्हणून यव्ह हा