पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लो० टिळकांचे चरित्र भाग ७ यांच्या पूर्वीचा हिंदुस्थानचा इतिहास ( ४ ) शांकरदर्शन (अद्वैत ) ( ५ ) प्रांतिक राज्यव्यवस्था. (६) हिंदु लो किंवा हिंदुधर्मशास्त्र. ( ७ ) इन्फिनिटे - समिल कॅलक्युल्स. (८) भगवद्गीतारहस्य - नीतिशास्त्र ( ९ ) शिवाजीचे चरित्र (१०) खाल्डिया व हिंदुस्थान. भाग- ( राजकीय विषयक ) ( १ ) प्रास्ताविक ( २ ) वर्णाधिराज्य - चातुर्वर्ण्य ( ३ ) (हिंदु) राज्य व साम्राज्य ( ४ ) बुद्ध युग-शक राजे. पुनरुज्जीवन (५) मुसलमानांच्या आधीची राज्ये व मुसलमानी साम्राज्य. ( ६ ) मुसलमानी राज्याचा व्हास - मराठे शीख वगैरे ( ७ ) इंग्रजांची राज्यस्थापना ८ ) इंग्लंडच्या राजाच्या अमलाखालचा कारभार (राज्यघटना ) ( ९ ) राज्यसत्तेचे एकीकरण (१०) नोकरशाही व तिचे ध्येय ( स्पेन आस्ट्रिया रशिया वगैरे देशातील नोकरशाहीशी तुलना ) ( ११ ) सुधारणा व प्रगति ( दोन निरनिराळी मते ) ( १२ ) हितविरोधाचा परिहार, ही यादी एरवीच एवढी मोठी आहे की तींत लिहिलेले ग्रन्थ टिळकांच्या पद्धतीने संपूर्ण सांगोपांग लिहावयाचे तर त्याला कोणाचा एक जन्मद्दि पुरता ना. वरील यादीच्या मथळ्यावर इतकाच मजकूर आहे की " खाली लिहिलेले ग्रन्थ योजले आहेत किंवा ते लिहावे असे मनात येते. " यादीत 'वेदांगज्योतिष' या ग्रंथाचा उल्लेख नाही. तथापि त्याच प्रबंधावर कार्तिक शुद्ध प्रतिपदा शके १८३५ व तारीख ३० आक्टोबर १९१३ हा दिवस स्वतः टिळकांच्या हाताने लिहि- लेला आढळतो. पण ही तारीख 'गीतारहस्य' लिहून झाल्यानंतरची आहे.- उलट खुद्द गीतारहस्य हे याच यादीत क्रमांक ८ला दिलेले आहे. आणि त्याच ग्रंथापुढे Ethics किंवा नीतिशास्त्र असा आणखी स्पष्ट उल्लेख असल्यामुळे टिळ- कानी लिहिलेले व हल्ली प्रसिद्ध झालेले हेच ते पुस्तक होय दुसरे कोणते नव्हे यांत शंका राहात नाही. दुसरे पक्षी क्रमांक १० या ठिकाणी उल्लेखिलेल्या म्हणजे 'खाल्डिया व हिंदुस्थान' या विषयावरचा निबंध टिळकानी मंडालेहून पुण्यास परत आल्यानंतर १९१७ साली डॉ. भांडारकर यांच्या स्मरणार्थ प्रसिद्ध झालेल्या निबंध संग्रहाकरिता लिहिला. तात्पर्य या यादीवरून निर्णायक असे अनुमान काही निघत नाही. कसे ते पहा. वेदांग ज्योतिष हा प्रबंध गीतारहस्य लिहून झाल्यावर मंडाले येथील तुरुंगातच लिहिला. पण त्याचा यादीत उल्लेख नाही. गीतारह- स्याचा उल्लेख यादीत आहे पण योजलेला किंवा मनात आलेला ग्रन्थ असाच त्याचा उल्लेख आहे. व खाल्डिया आणि हिंदुस्थान हा प्रबंध पुढे १९१७ साली लिहून झाला त्याचाहि याच यादीत उल्लेख आहे ! तथापि त्यातल्या त्यात निश्चित अनुमान काढावयाचे तर ते असे वाटते की ही यादी हाताने लिहिताना वेदांग ज्योतिषावर ग्रंथ प्रबंध लिहिण्याचे टिळकांच्या मनात नसावे. मात्र गीतारहस्य