पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ७ प्रास्ताविक भाग ७ गीतारहस्य व इतर प्रबंध ( १ ) प्रास्ताविक रिकाम्या हाताना काही तरी चाळा हा लागतोच. तो मनुष्यस्वभावच आहे. पण तो चाळा आसुरी असेल की दैवी असेल हे ' देणे ईश्वराचे. ' टिळ- कांचे हात फक्त तुरुंगवासाशिवाय मोकळे असे केव्हाहि फारसे नसत. पण ते मोकळे असत तेव्हा त्यांचा चाळा कोणत्या प्रकारचा असे हे आम्ही या ग्रंथाच्या पूर्वार्धाचे शेवटी सांगितलेच आहे. तुरुंगवासात हाताना चाळा करण्याला वेळ पुष्कळ पण तेथे साधने कमी. १८८२तली कैद साधी होती. तरी लिहिण्यावाच- ण्याचे साधन नव्हते. पण स्नेही आगरकर हे ' सांगाती' असल्यामुळे त्यानी ते एकांतवासाचे व निरुद्योगीपणाचे चार महिने वादविवाद व चर्चा करून घालविले. १८९७-८ च्या तुरुंगवासात टिळकाना शिक्षा सक्तमजुरीची असल्यामुळे त्यांच्या हाताना चाळा जेलरने नेमून दिलेल्या कामाचाच असे. म्हणून काथ्या खोलणे रंग तयार करणे असली कामे त्यानी केली. १९०८च्या खटल्यात शिक्षा काळे- पाण्याची म्हणून प्रथम सक्तमजुरीची. पण पुढे ती साधी करून टिळकाना सर- काराने मंडाले येथे नेऊन ठेवल्यावर लेखन वाचनाच्या व्यवसायाची साधनेहि त्याना देण्यात आली. यामुळे त्याना हाताचा चाळा मनाच्या आवडीप्रमाणे करिता आला. व तो त्यानी कोणता केला हे आता पाहू. हे पाहणाराला मुख्य सहाय - टिळकांच्या चिरंजीवानी तीन वर्षापूर्वी प्रसिद्ध केलेल्या. नावाच्या इंग्रजी पुस्तकाचे होईल. कारण या पुस्तकात आम्ही पुढे निर्दिष्ट केलेल्या काही ग्रंथांचा उल्लेख काहीची टिपणे व वेदांग ज्योतिषावरील संबंध निबंध अशी छापलेली आहेत. पुस्तकात उल्लेखिलेले काही निबंध व ग्रंथ टिळकानी तुरुंगातून सुटून आल्यावर स्वतः छापविले. पण 'वेदांगज्योतिष ' हा निबंध त्यांच्या हातून छापून झाला नाही. म्हणून तो प्रसिद्ध करून त्यांच्या चिरंजीवानी वाचक वर्गावर मोठा उपकार केला आहे. मंडाले येथील तुरुंगात हाती असलेल्या साधनांचा उपयोग करून जे ग्रंथ प्रबंध टिळकानी लिहिले त्यांची माहिती आम्ही पुढे देणारच आहो. तथापि रिकाम्या वेळात जे कोणकोणते ग्रन्थ लिहावयाचे म्हणून टिळक मनन करीत होते अशांची एक यादी उपलब्ध आहे. तीत खालील नावे मूळ इंग्रजीत लिहि- लेली आहेत. ( १ ) हिंदुधर्माचा इतिहास - वैदिक श्रौत उपनिषदे इतिहास पुराणे दर्शने भक्ति. ऐतिहासिक कालापूर्वीचे- इतर धर्म व उपसंहार. - ( २ ) हिंदु राष्ट्रधर्म ( वृत्तान्त व त्याच्या निरनिराळ्या अंगांचे वर्णन ) (३) रामायण महाभारत