पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग १ १९१४-१९१५ मधील निवडक पत्रे ४.१ (१३) बळवंतराव देशपांडे यांचे केळकराना पत्र अहमदनगर येथे दक्षिण आफ्रिकेतील चळवळीकरिता वर्गणी गोळा करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहो व तो सर्व पक्ष मिळून करीत आहो. असे काम केल्याने जुने भेदभाव सहजच लोपून जातात. पुण्यातील लोक सुज्ञ असून त्यानीहि हे भेदभाव नाहीसे करण्याची खटपट करावी व सर्वानी मिळून एक विचाराने सर- काराशी झगडावे. गोखले यांच्या मागण्या असाव्या तितक्या मोठ्या नाहीत है। खरे पण त्यांचा आधार घेऊन उद्योगप्रियतेने सार्वजनिक कार्य कसे काय करावे याविषयी लोकाना बोध करण्याला त्यात पुष्कळ जागा आहे. (१४) बाबू मोतिलाल घोस यांचे केळकरांना पत्र कलकत्ता २६ नोव्हेंबर १९१४ या चंडाळानी मला देवघरहून ओढून आणलेच. काल सभा झाली व त्यात काय झाले हे आजच्या पत्रिकेच्या अग्रलेखात दिलेच आहे. या अग्रले- खावरून असे दिसेल की कलकत्त्यातील उभय पक्षाच्या पुढाऱ्यानी सहविचार करून खालील ठराव केले (१) काँग्रेसबाहेर असलेल्या लोकानी प्रतिज्ञालेखावर तात्पुरती सही करावी व इतर सर्व घटनाहि तात्पुरती मान्य करावी. आणि मग सर्वानी मिळून एक कमिटी नेमून जी काय घटना ठरेल ती सभेपुढे मांडून मंजूर करून घ्यावी. प्रतिज्ञा लेखावर तात्पुरत्या सह्या देण्यास तयार झाल्यावर यंदा देखील जाहीर सभेने निवडलेल्या प्रतिनिधीना सभेत घ्यावे. (१५) आळतेकर यांचे टिळकाना पत्र कऱ्हाड २ डिसेंबर १९१४ मी तर सुब्रह्मण्य अय्यर याना असे लिहिले आहे की ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या सभासदाना सर्क्युलर पाठवूनच अभिप्राय मागवावे. बंगाल व संयुक्तप्रांत हे जाहीर सभाना अधिकार देण्याला अनुकूल दिसतात. खुद्द मद्रास येथील लोकानीहि आपले मत किंचित् या दिशेने बदलले आहे. म्हणून अभि- . प्राय मागविले असता मुंबईचे लोक प्रतिकूल असताहि आपल्या म्हणण्याप्रमाणे होईल.. (१६) बळवंतराव अनगळ यांचे केळकराना पत्र उमरावती ६ डिसेंबर १९१४ मी मानभाव मंडळीना तुमच्याकडे पाठविले त्यांचे काम तुम्ही घेतले हे पाहून बरे वाटले, आम्ही येथून कमिशनपुढे विचारण्याकरिता काही प्रश्न तयार टि० उ... ४.