पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९३ लो० टिळकांचे चरित्र भाग ६ जातात. किंबहुना इकडे कायमची प्रोफेसराची जागा हिंदुस्थानने निर्माण करावी. आणि वर्षांच्या निम्या भागात एका देशात व निम्या भागात दुसऱ्या देशात हिंडून त्यानी व्याख्याने द्यावीत. इकडील विद्वान लोकांचे लक्ष देशी भाषामध्ये असलेल्या वाङ्मयाकडे लावण्याचा मी प्रयत्न करीत आहे. इकडे १९१६ च्या अखेर मी आलो. त्यानंतर मी निरनिराळी पुस्तके प्रसिद्ध केली आणि मासि- कातून लेखहि लिहिले. असा एक प्रोफेसर नेमण्याला खर्च दरसाल दहा हजार रुपये व प्रवासखर्च १५०० रुपये येईल असे वाटते. सुचले ते आपणास लिहिले.