पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ६ १९१९ व २० सालामधील निवडक पत्रे ९२. (५१) दप्तरी यांचे टिळकाना पत्र नागपूर २२ जुलै १९२० आपणाकडून मोघे व वाघोलीकर हे मदतीला आले त्याचे दुसन्या दिव- सापासून कामास सुरवात केली आहे. सकाळी पाच पासून नऊ दहा पर्यंत मी करण- ग्रंथ सांगतो व ते लिहून घेतात. त्यांच्याबरोबर आमचे येथील एक ज्योतिषी अग्निहोत्री हि एक प्रत तयार करितात. अशा रीतीने या ग्रंथाच्या तीन प्रती तयार होत आहेत. दुपारी कोष्टके करण्याचे काम चालू असते. केतकरांच्या चंद्रमंदफल कोष्टकात कोठे कोठे १.५ कलांची चूक दिसून आल्यामुळे, व ते कोष्ठक केतकरानी तिथी तिथीच्या अंतराने केल्यामुळे चूक होत असेल म्हणून ते करणा- करणाच्या अंतराने द्यावे असे इष्ट वाटल्यामुळे, ते कोष्ठक पुनः करण्याची जरूरी दिसून आली. यामुळे त्याची सोपी रीती बसवून ते काम मोघे यांच्याकडे दिले आहे. या कोष्टकाचे ३६०० अंक तयार करावयाचे आहेत. प्रो. नाईक यांची शीघ्रफलासंबंधी सूचना होती त्यांचीहि एक सोपी रीत लॉगर्थमची बसवून ते काम वाघोलीकर याजकडे दिले आहे. आजपर्यंत ग्रंथाचे मध्यमाधिकार चंद्रसूर्य स्पष्टीकरण पंचागाधिकार त्रिप्रश्नाधिकार अंशतः झाले आहेत. हान्सेनचे अलमनॅक प्रमाण मानावे किंवा नॉटिकल प्रमाण मानावे हा मोठा प्रश्न आहे. मी हान्सेनच्या बाजूचा निर्णय करीन म्हणतो. तरी आपला अभिप्राय कळवावा. हर्षल व नेपच्यून यांचेहि गणित द्यावे काय ? मला खालील पुस्तके पाहिजेत. 1. Chamber's Mathematioal Tables 2. Lunnar Theory 3. Planatory Theory dealing specially with Jupitar and Saturn शेवटची दोन पुस्तके केरोपंत छत्रे यांच्या ग्रंथसंग्रहात असावीत. ही सर्व मजकडे लौकर पाठवा. (५२) प्रो. विनयकुमार सरकार यांचे टिळकाना पत्र न्यूयॉर्क २८ जुलै १९२० माझे असे मत आहे की कला व शास्त्रे यामध्ये हिंदुस्थानची बरीच प्रगति झाली असल्याकारणाने तिकडील विद्वान् प्रोफेसर मंडळी इकडे यावी. तिकडील विद्यापीठे व परिषदा यांचा पुरस्कार घेऊन त्यानी इकडे यावे. इतर देशांचे प्रोफेसर अशाच हेतूने इकडे येतात व व्याख्याने देतात आणि सहानुभूति मिळवून