पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९१ लो० टिळकांचे चरित्र भाग ६ करिता आता हुकूम देत आहेत ! पण चौकशी - साक्षीदार लोकाना धाक दपटशा दाखवून व तंबी देऊन पुराव्याची गळचेपी होईल असे वाटते. ब्रिटिश काँग्रेस कमिटीची स्थिति समाधानकारक नाही. कमिटीचे सेक्रेटरी व 'इंडिया' पत्राच्या संपादक बाई यांची भांडणे सुरू आहेत. पार्लमेंटचे काहीं सभा- सद कमिटीवर घेतले आहेत. पण त्यातले कोणी अद्यापि कमिटीच्या सभेला आले नाहीत. ते म्हणतात की डॉ. क्लार्क यांचेपेक्षा अधिक कोणी तरी चलाख मनुष्य चेअरमन असावा. काही सभासद सेक्रेटरीच्या बाजूचे व काही संपादकांच्या बाजूचे आहेत. कमिटी मुख्यतः हॉर्निमन व मिस नॉर्मंटन यांच्या हाती आहे. स्पूर याना कमिटीचे चेअरमन करावे असे काही लोक सुचवितात. स्वतः डॉ. क्लार्क यांचे म्हणणे लॉर्ड क्लुईड (हरबर्ट रॉबर्टस्) हे चेअरमन होतील तर बरे. त्यावर मी म्हणालो की आता लिवरलपक्षाची संगत पुरे झाली. मजूरपक्षातील एखादा पुढारी पहा. सर शंकरन नायर यांचे मत स्पूर याना चेअरमन करावे असे आहे. XXX तात्पर्य येथे एकदोन हिंदी गृहस्थ काँग्रेसतर्फे कायमचे राहतील अशी व्यवस्था होणे जरूर आहे. इंटर कमिटीवरील वरिष्ठ सभेतील वादविवाद येत्या सोमवारी होणार आहे. हाऊस ऑफ कॉमन्समधील वाद आपण वाचलाच असेल. हिंदी लोकांच्या संमतीने आणि त्यांचा स्नेह संपादून राज्य चालविले पाहिजे असे मत माँटेग्यू- साहेबानी व्यक्त केले. पार्लमेंटमध्ये सात तास वादविवाद चालू होता. आणि हिंदु- स्थान हे कोणत्या उपायानी ताब्यात ठेवावे याचाच तो मुख्यतः वाद होता. (५० ) हिल्डा हाऊसीन बाईंचे टिळकाना पत्र लंडन २० जुलै १९२० आम्ही नॉरफोल्क काउंटीत दौऱ्यावर गेलो होतो ते नुकतेच परत आलो. अनेक सभाना पाचशे पासून चार हजार पर्यंतहि गर्दी असे. चेम्सफर्ड ओड्वायर डायर यांची जाहीर चौकशी करावी व पंजाबच्या अत्याचारासंबंधी जे गुन्हे त्यांच्यावर लागू होतील त्याबद्दल त्याना शिक्षा द्यावी, तसेच हिंदुस्थानाला स्वराज्य द्यावे, अशा अर्थाचे ठराव प्रत्येक सभेतून पास झाले. पूर्वीचे अंडर सेक्रे- टरी चार्लस् रॉबर्टस् व त्यांचे विरुद्ध मजूर पक्षाचे जॉर्ज एडवर्डस् हे निवडणुकीत उभे होते. एका समेत चार्लस् रॉबर्टस् यानी चेम्सफर्ड याना हिंदुस्थानचा उप- कारकर्ता असे म्हटले तेव्हा 'रौलेट अॅक्टाचाच उपकार नव्हे का?' असे मी मध्येच विचारले. तेव्हा ते निरुत्तर झाले. अँग्लो इंडियन लोक इकडे आपली शिकस्त करीत आहेत. मला कोणी विचारीत तेव्हा मी म्हणे की 'मी कोणत्याच राजकीय पक्षाची नाही. पण मजूर पक्षातली आहे. म्हणजे ज्या पक्षाला हिंदुस्थानाकरिता स्वातंत्र्य मागण्याचा हक्क आहे त्या पक्षातली आहे असे वाटेल तर म्हणा.