पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ६ १९१९ व २० सालामधील निवडक पत्रे ९० पौंड आपणास कर्ज म्हणून रहातील व ते आपणास द्यावे लागतील. वर्तमानपत्रे काढल्यास त्यांचे धोरण तुम्ही खापर्डे व मी वगैरे लोकानी ठरवावे असे म्हणते तरी या कामात पडावे की नाही ते कळवावे. (४८) डॉ. हर्डीकर यांचे केळकराना पत्र न्यूयॉर्क १२ जुलै १९२०. यासोबत येथील स्वराज्य संघाच्या कामाचा अहवाल पाठविला आहे. येथे पैशाची फार टंचाई आहे. पण कॉंग्रेसकडून काही रकम आल्यास आम्ही अधिक काम करू शकू. प्रथम आम्ही 'यंग इंडिया ' पत्र काढले. हस्तपत्रके वगैरे सुमारे दहा लक्ष काढून वाटली. लहान पण हस्तपत्रकाहून मोठी अशीहि तीन पुस्तके काढून त्यांच्या पुष्कळ प्रती वाटल्या. व्याख्याने देतच आहोत. हिंदु- स्थानविषयक पुस्तकांचे एक लहानसे दुकानच मांडले आहे म्हणाना. त्यांचा उप- योग व्याख्याने वगैरे देण्याकरिता येथील हिंदी विद्यार्थ्यांना होतो व काही अमे- रिकन लोकहि पुस्तके घेतात. काही मोठ्या शहरी संघाच्या शाखा उघडण्याचा विचार आहे. महिन्यातून दोन बातमीपत्रे हिंदुस्थानास इकडून पाठवावयाची आणि विद्यार्थी व इतर कोणी याना लागेल ती माहिती पुरवावयाची असा विचार केला आहे. गेल्या तीस महिन्यात निरनिराळ्या प्रकारानी आम्हाला अठरा हजार डॉलर उत्पन्न झाले. त्यातच टिळकानी पाठविलेले सहा हजार डॉलर आहेत. पण निरनिराळे खर्च होऊन आता फक्त रोख हातात साडेतीनशे डॉलर व अठराशे पंचाहत्तर डॉलरचे शेअर्स असे आहेत. इकडील मतप्रसारावर काँग्रेसने खर्च केल्यास त्याचा चांगला उपयोग होईल. न्यूयॉर्कहून इतर सर्व देशात आम्हाला पत्रव्यवहाराला व इतर सर्व बाबतीत खुला दरवाजा मिळतो. त्याचा काँग्रेसने का उपयोग करून घेऊ नये ! (४५) पटेल यांचे टिळकाना पत्र लंडन १४ जुलै १९२० 14 मी ता. ७ ऑगस्टला ' कैसरहिंद' बोटीने निघतो. आपल्या पत्राची बाट पहात होतो पण शेवटी आगबोटीची तारीख निश्चित केली. स्पेशल कॉंग्रेसच्या आधी तिकडे येण्याची फार इच्छा आहे. जॉइंट कमिटीने मतदारीसंबंधाचे नियम केले ते फारसे उदारपणाचे नाहीत. त्याना काही उपसूचना देण्याची व्यवस्था मी करवितो. गेल्या आठवड्यात नॉटिंगहॅम व डर्बी येथे मी जाऊन दोन व्याख्याने दिली... मिसेस नायडू व माँटेग्यू यांच्या दरम्यान झालेला पत्रव्यवहार पाहण्यास पाठविला आहे. लष्करी कायदा सुरू असता पंजाबात स्त्रियांना किती वाईट वागविण्यात आले याची माहिती स्टेट सेक्रेटरीला नाही असा बादाणा आहे व चौकशी करण्या- टि० उ...३७